Home > Entertainment > 'भोला' चित्रपटातील तब्बूचा नवा लुक बनलं चित्रपटाच आकर्षण...

'भोला' चित्रपटातील तब्बूचा नवा लुक बनलं चित्रपटाच आकर्षण...

भोला चित्रपटातील तब्बूचा नवा लुक बनलं चित्रपटाच आकर्षण...
X


प्रत्येक वेळेस तब्बू तिच्या अभिनयातून आणि तिच्या लूक मधून चाहत्यांच्या मनात आकर्षण निर्माण करते. तर दृश्यम २ नंतर तब्बूने साकारलेल्या अनोख्या अभिनयाने आणि तिने साकारलेली पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेने चाहत्यांना वेड करुन टाकलं आहे .आपल्याला माहीतच आहे कि तब्बू आणि अजय देवगण यांची मैत्री फार जुनी आहे . यावेळी सुद्धा त्यांचे अनेक चित्रपट गाजले होते . तब्बूच्या चाहत्यांना नेहमीच हि जोडी पाहायला आवडते . पण आताच्या अनेक सिनेमातून तब्बूची दबंग स्टाईल सुद्धा सर्वांनी उचलून धरली आहे.

या नंतर तब्बूचा आता नवा अंदाज लवकरच पाहायला मिळणार आहे. 'भोला' या चित्रपटात पुन्हा एकदा तब्बू खाकी वर्दीत पोलिसच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अजय देवगण ने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ते या चित्रपटात काम देखील करणार आहेत.

अजय देवगण ने प्रेक्षकांना तब्बूचा अनोखा अंदाज शेअर केला आहे या लुक मध्ये तब्बू हातात बंदूक घेऊन दिसत आहे. तब्बूच्या या अनोख्या लुकने चाहत्यांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे.

Updated : 18 Jan 2023 1:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top