Home > Entertainment > बापरे.., सनी लिओन, नोरा फतेहीच्या नावाने लाखो लुटले

बापरे.., सनी लिओन, नोरा फतेहीच्या नावाने लाखो लुटले

बापरे.., सनी लिओन, नोरा फतेहीच्या नावाने लाखो लुटले
X

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओन, नोरा फतेही, अभिनेता टायगर श्रॉफ, गायक गुरु रंधावा यांसारख्या चित्रपट कलाकारांची लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्याच्या नावाखाली 9 कोटींची फसवणूक करण्यात आली. ऑनलाइन तिकिटांची विक्री करून फसवणूक करणाऱ्या फायनान्सर आणि तीन आयोजकांना 9 महिन्यांनंतर एसटीएफने अटक केली आहे. लखनऊच्या एकना स्टेडियममध्ये शो आयोजित करण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली होती. अटक केलेल्या आयोजकांनी मे-2022 मध्ये श्री सुविधा फाऊंडेशनच्या नावाने शो आयोजित करण्याच्या नावाखाली तिकिटे विकली होती. शोच्या काही दिवस आधी आयोजकांनी फोन बंद करून पळ काढला. लखनौमधील गोमती नगर एक्स्टेंशन पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Updated : 31 July 2023 5:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top