Home > Entertainment > "चाकोरीबद्ध आयुष्य जगू नका" आशिष विद्यार्थींच्या पहिल्या पत्नीची पोस्ट व्हायरल

"चाकोरीबद्ध आयुष्य जगू नका" आशिष विद्यार्थींच्या पहिल्या पत्नीची पोस्ट व्हायरल

चाकोरीबद्ध आयुष्य जगू नका आशिष विद्यार्थींच्या पहिल्या पत्नीची पोस्ट व्हायरल
X

माणसाच्या आयुष्यात लग्न हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. एखाद्याने एक सोडून दुसरं लग्न केलं किंवा तिसरं लग्न केलं ,तर त्या जोडीदारांपेक्षा लोकांमध्ये जास्त चर्चा रंगायला सुरुवात होते.

आता हेच पहा ना आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या साठाव्या वर्षी दुसरे लग्न केलं आणि त्यामुळे ते ट्रोलही झाले .पण आशिष विद्यार्थी यांची पहिली पत्नी कोण आहे ?ती काय करते आणि ती कशी दिसते ?याची सर्वांनाच उत्सुकता आहे ... आशिष विद्यार्थी यांची पहिली पत्नी पिलू उर्फ राजोशी विद्यार्थी नक्की आहेत कोण आणि त्यांचा आता काय म्हणणं आहे ?वाचा पूर्ण लेख ...
पिल्लू विद्यार्थी या ऍक्टर , सिंगर ,राईटर त्याचबरोबर एक उत्तम कलाकार आहेत. आशिष विद्यार्थी यांच्याशी त्यांचं नातं हे नेहमीच प्रेमळ असल्याचं त्यांच्या सोशल मीडियाच्या फोटोमधून दिसते. हे आहेत काही फोटो.
पण कदाचित त्यांच्या सुखी संसाराला काही वाईट वळण लागलं असेल तर ते लोकांच्या प्रतिक्रियेतून ठरवणं चुकीचं ठरेल . त्यामुळे स्वतः पिलू विद्यार्थी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे ,ती पोस्ट कोणती चला पाहूया...

त्यांनी इंस्टाग्राम वर एक स्टोरी शेअर केली आणि लिहिलंय की "तुम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे का ? असा प्रश्न एक चांगला व्यक्ती तुम्हाला विचारणार नाही ,तो असा प्रश्न तेव्हाच करेल जेव्हा त्याला माहीत असेल की तो तुम्हाला त्रास देईल ... हे लक्षात ठेवा"
त्याचबरोबर त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की ,"एखाद्या गोष्टीचा खूप विचार केला ना गोंधळ होतो . आता सगळं संपलं आहे ,असं वाटतं... पण आता आयुष्यात शांती येऊ देत, तुम्हाला हा आशीर्वाद मिळावा कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात." राजोशी म्हणजेच पिलू विद्यार्थि सोशल मीडियावर फोटो सुद्धा शेअर केलाय आणि त्याखाली लिहिलंय "चाकोरीबद्ध आयुष्य जगू नका"

राजोशी / पिलू विद्यार्थी मूळच्या कुठल्या आहेत ?
पिल्लू विद्यार्थी यांचा जन्म पश्चिम बंगाल येथील आहे . त्या बंगाली अभिनेत्री शकुंतला बरवा यांच्या कन्या आहेत . आईमुळेच त्यांना अभिनयाची गोडी लागली होती . त्यांनी १९९३ मध्ये टाइम्स एफएम मध्ये आर जे म्हणून काम सुरू केलं आणि " सुहानी सी एक लडकी " या मालिकेत 2019 मध्ये त्यांनी काम केलं आहे. अभिनेत्री सोबत त्या उत्तम गायिका सुद्धा आहेत.
या होत्या आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या पत्नीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ? नक्की प्रतिसाद कळवा ...

Updated : 27 May 2023 7:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top