Home > Entertainment > अभिनेत्रीने अंतर्वस्त्र काढलं म्हणून प्रेक्षकांमध्ये नाराजी, चित्रपट बॅन करण्याची होतेय मागणी

अभिनेत्रीने अंतर्वस्त्र काढलं म्हणून प्रेक्षकांमध्ये नाराजी, चित्रपट बॅन करण्याची होतेय मागणी

अभिनेत्रीने अंतर्वस्त्र काढलं म्हणून प्रेक्षकांमध्ये नाराजी, चित्रपट बॅन करण्याची होतेय मागणी
X

समाजमाध्यमांमध्ये नेटफ्लिक्सवरील 'Ashab Wala Aaz' या सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा पहिला अरबी सिनेमा आहे. या सिनेमावरून अरब आणि इजिप्त या देशांमध्ये वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. सिनेमात दाखवण्यात आलेली काही दृश्य पाहिल्यानंतर हा सिनेमा बॅन करण्याची मागणी तेथील प्रेक्षकांनी केली आहे.

'अशब वाला आज' हा सिनेमा इटालीयन सिनेमा 'Perfect Strangers' चा अरबी रिमेक आहे. या सिनेमाच्या एका दृश्यात मुख्य भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्रीला तिची अंतर्वस्त्र काढताना दाखवण्यात आलं आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर मुस्लिम देशांमधले प्रेक्षक संतापले आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून अरब समाजाला भ्रष्ट करण्याचा तसेच अरब देशांच्या संस्कृतीवर निशाना साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे.

इजिप्तमध्ये सिनेमातील या दृश्यावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे, कारण मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री मोना झाकी ही इजिप्तमधील प्रसिध्द अभिनेत्रींपैकी एक आहे. तेथील लोकांना, "हिच्यासारखी मोठी अभिनेत्री अशा दृश्यात कसं काय काम करू शकते? इतकंच काय तर चित्रपट समीक्षकांनीदेखील तिच्यावर आक्षेप घेतला आहे. समीक्षकांचे म्हणणं आहे की हा सिनेमा समलैंगिकतेला प्रोत्साहन देतो.

'अशब वाला आज' हा सिनेमा अनेक आंतराष्ट्रीय भाषांमध्ये डब केला आहे. मुस्लिम देशांमध्ये या चित्रपटावरून विरोध होत आहे. त्यात सगळ्यात जास्त विरोध हा इजिप्तमधून होत आहे.

या सिनेमात एका दृश्यामध्ये तुला तुझ्या प्रियकरासोबत संभोग करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा संवाद वडिल आणि मुलीमध्ये दाखवण्यात आला आहे. सिनेमातील आणखी एका दृश्यामध्ये एक महिला डेटला जाताना अंतर्वस्त्र काढून जाताना दाखवण्यात आलं आहे. एका दृश्यात एक माणूस स्वतःला समलैंगिक असल्याचे सांगतो. त्याने केलेल्या या खुलाशाने त्याच्या मित्रांना धक्का बसतो. या साऱ्या दृश्यांवर प्रेक्षाकांनी आक्षेप नोंदवला आहे.

Updated : 4 Feb 2022 12:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top