Home > Entertainment > चंदीगडशी मुंबईची तुलना केल्यास, मुंबई 30 वर्षे मागे : अनुपमा सोलंकी

चंदीगडशी मुंबईची तुलना केल्यास, मुंबई 30 वर्षे मागे : अनुपमा सोलंकी

चंदीगडशी मुंबईची तुलना केल्यास, मुंबई 30 वर्षे मागे : अनुपमा सोलंकी
X


"नथ कृष्ण और गौरी की कहानी" या हिंदी सीरिअल मधील अभिनेत्री अनुपमा सोलंकी म्हणते की पावसाळ्यात चित्रीकरण करू शकते हेच मी भाग्याचे मानते. मुंबईच्या प्रेमात तर सगळेच पडतात . तसेच आता अनुपमाला सध्या मुंबईचे हवामान खूप आवडत असल्याचे ती सांगते.

“मी मान्सून प्रेमी आहे आणि सुदैवाने मी सध्या माझा नवीन शो 'नथ कृष्ण और गौरी की कहानी' करत आहे. पावसाळ्यात मी सकाळी लवकर शूटिंगला जाते आणि पावसाचा आनंद घेते. ताजी हवा आणि पावसाचे थेंब, काळ्या ढगांसह सुंदर हवामान आणि पोहे आणि चाय यामुळे स्वर्गीय आनंद मिळतो असं ती म्हणते . मला माहित आहे की हे वेडे वाटेल,” असं म्हणून तिने मुंबईतील मान्सूनचा आनंद घेत असल्याचे सांगितले आहे.

चंदीगडशी मुंबईची तुलना केल्यास, मुंबई 30 वर्षे मागे





“कधीकधी जेव्हा आम्हाला घराबाहेर चित्रीकरण करावे लागते तेव्हा ते खूप कठीण होते, परंतु प्रॉडक्शन हाऊसला या समस्येची जाणीव आहे, म्हणून आम्ही घरामध्ये शूटिंग करण्याचा पर्याय निवडतो. मुंबईतील ही सर्वात मोठी समस्या असून, आश्चर्याची बाब म्हणजे पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय नाही. मला आश्‍चर्य वाटते कारण मुंबई हे विकसनशील शहर असूनही तेथील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. वाहतूक कोंडीची समस्या कायम असून, शासनाकडून कोणताही तोडगा निघत नसल्याचे दिसून येत आहे. माझ्या गावी, चंदीगडशी मुंबईची तुलना केल्यास, मुंबई 30 वर्षे मागे असल्यासारखे वाटते,” ती म्हणते.

ती पुढे म्हणते, “मला कोणत्याही भीतीशिवाय पावसाचा आनंद घ्यायचा आहे, पण माझे शूट सुरू असल्याने मी आजारी पडण्याबाबतही सावध आहे. त्यामुळे आजारी पडू नये म्हणून मी स्वतःची काळजी घेते .”

तिच्या बालपणीच्या आठवणींबद्दल सांगताना ती म्हणते, “मला माझे बालपणीचे दिवस आठवतात, शाळा ते घर आणि घर ते शिकवणीपर्यंतचा प्रवास आणि सुंदर पावसात समोसेसोबत संध्याकाळच्या चहाचा आस्वाद घेणे. ते सोनेरी दिवस होते आणि मला पश्चात्ताप करायचा नाही, म्हणून मी रोज सकाळचा आनंद घेण्याचा प्रयत्न करते .”

अनुपमाने पावसाचा आनंद घेण्याबद्दल स्वतःच मत व्यक्त तर केले आहेच पण मुंबईच्या विकासाबद्दलही ती बोलली आहे .

Updated : 4 July 2023 5:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top