Home > Entertainment > 'अनुपमा'च्या आईची कोरोनामुळे एक्झिट...

'अनुपमा'च्या आईची कोरोनामुळे एक्झिट...

अनुपमाच्या आईची कोरोनामुळे एक्झिट...
X

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी गोगटे यांनी वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात मध्ये कोरोना झाल्याने त्यांचं निधन झालं. त्या स्टार प्लस वाहिनीवरील अनुपमा या प्रसिद्ध मालिकेत काम करत होत्या. या मालिकेत त्यांनी अनुपमा च्या आईची भूमिका साकारली होती.

गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा यासारख्या सुप्रसिद्ध नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. अशोक सराफ यांच्यासोबत त्यांनी घनचक्कर या सिनेमातही काम केलं होतं. या शिवाय त्यांनी राजा बेटा, सपने सुहाने लडकपन के, कोई अपना सा, ऐसा कभी सोचा ना था, एक सफर, बसेरा, काही तो होगा या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी आपल्या भूमिका गाजवल्या होत्या. या शिवाय सध्या त्या अनुपमा या प्रसिद्ध मालिकेत काम करत होत्या.

स्वप्नांच्या पलीकडले, तुझं माझं जमतंय, या मराठी मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या. त्यांच्या मागे पती आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Updated : 22 Nov 2021 7:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top