Home > Entertainment > बिग बींचं जुन्या आठवणींना उजाळा; दिवाळीनिमित्ताने पत्नीसोबतचा खास 'ब्लॅक अँड व्हाइट' फोटो केला शेअर

बिग बींचं जुन्या आठवणींना उजाळा; दिवाळीनिमित्ताने पत्नीसोबतचा खास 'ब्लॅक अँड व्हाइट' फोटो केला शेअर

बिग बींचं जुन्या आठवणींना उजाळा; दिवाळीनिमित्ताने पत्नीसोबतचा खास ब्लॅक अँड व्हाइट फोटो केला शेअर
X

अमिताभ बच्चन आपल्या अभिनयाने आणि शैलीने चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. गेल्या काही काळात त्याच्या पोस्ट चाहत्यांची मने जिंकतायत. यापूर्वी त्याने केबीसीच्या सेटवरील चार रंगीत छायाचित्रे शेअर केली होती. त्यातच यावेळी त्यांनी खास दिवाळी सणावर बच्चन यांनी पत्नी जया बच्चनसोबत दिवाळीचा एक खास थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. बिग बी यांनी रात्री 12 वाजता त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हा फोटो शेअर केला आहे.

पत्नीसोबतचा खास फोटो केला शेअर

अमिताभ बच्चन यांनी नुकताच शेअर केलेला हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. या फोटोत जया बच्चनही दिसत आहेत. हातात सुरुसुरी पेटवताना दोघंही खूप आनंदी दिसत आहेत. बिग बी यांनी हा फोटो शेअर करताच चाहत्यांनीही त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या, विशेष म्हणजे कोरोनाची परिस्थिती पाहता यावेळी बिग बींच्या घरी दिवाळी पार्टी झाली नाही.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कामाबद्दल सांगायचे तर, शेवटच्या वेळी ते 'गुलाबो सिताबो' आणि 'चेहरे' चित्रपटात दिसले होते, तेव्हा त्यांचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत आयुष्मान खुराना होते. आगामी चित्रपटाबाबत बोलयाच म्हंटल तर ते आता 'झुंड' आणि 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यासोबत पाहायला मिळणार आहे.

Updated : 4 Nov 2021 4:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top