Home > Entertainment > मुलगा आगरी आणि "ती" फॉरेन रिटर्न ,कशी जमली जोडी?

मुलगा आगरी आणि "ती" फॉरेन रिटर्न ,कशी जमली जोडी?

मुलगा आगरी आणि ती फॉरेन रिटर्न ,कशी जमली जोडी?
X

बॉलिवूडमध्ये प्रेमावर भाष्य करणारे अनेक चित्रपट आले आणि गाजले सुद्धा ... प्रत्येक चित्रपटाची कहाणी वेगवेगळी असते ...दोन प्रेमात असलेल्या व्यक्तींचा विरोधाभास शेवटी कसा एकत्र येतो याची उत्तम उदाहरणे या सिनेमांमधून पाहायला मिळतात. आता असाच एक चित्रपट मराठीत येत आहे .ज्यामध्ये अमेय वाघ आणि त्याच्यासोबत वैदेही परशुरामी दिसणार आहे .... नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे .


यामध्ये अमेय हा आगरी कोळी समाजातील मुलगा दाखवला आहे तर वैदेही म्हणजेच ज्युलिएट हि एल ए म्हणजेच लॉसनजेलिस वरून आलेली दाखवली आहे .... या सिनेमाच्या ट्रेलरमध्येच अमेय वाघची धमाल कॉमेडी पाहायला मिळते .वैदेहीने प्रदेशात राहणाऱ्या भारतीय मुलीची भूमीला निभावली आहे ... अमेय तिच्या गाडीवरून जातानाचा एक सिन आहे त्यामध्ये तो एक कॉमेडी कविता सुद्धा करताना दिसत आहे ...वैदेही परशुरामीचा हटके लुक आणि बोलण्याचा अंदाज हा सुद्धा नवीन वाटत आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला हा सिनेमा येणार आहे . अमेय वाघने याआधीच्या चित्रपटातून त्याची जादू दाखवली आहे.आता बघायला हवं अमेय आणि वैदेही यांची जोडी ऑनस्क्रीन काय धमाल करते.

Updated : 11 Jan 2023 12:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top