अलका कुबल व अजिंक्य देव लंडनमध्ये ; नव्या चित्रपटाची चर्चा
अलका कुबल आणि अजिक्य देव यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या नविन चित्रपटाची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू आहे.
X
मराठी कलाविश्वातील प्रसिध्द ठरणारी जोडी नव्वद च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी जोडी सध्या लंडन मध्ये दिसली आहे. यानिमित्ताने मराठी चित्रपट सुष्ठीत नवा चित्रपट येणार का ? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होतोय. अलका कुबल आणि अजिक्य देव यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या नविन चित्रपटाची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू आहे.
"माहेरची साडी" या चित्रपटात अलका कुबल आणि अजिंक्य देव दिसले होते. त्यांच्या या बहीण-भावाचे नाते कस असाव, विशेष म्हणजे बहीणीच प्रेम प्रेक्षकांना पाहायला मिळालय. याच उत्तम चित्रीकरण दाखवल्याने तो चित्रपट आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अलका कुबल आणि अजिंक्य देव यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर फोटो शेअर केले आहेत. या मध्ये अलका कुबल यांनी "बऱ्याचं वर्षांनी लंडनमध्ये भेट" अस कॅप्शन देत तर अजिंक्य देव यांनी "लंडनमध्ये अलका कुबल यांच्या सोबत" अस कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत. हे पाहून त्यांच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट चा वर्षाव होत आहे. कोणी माहेरची साडी तर माहेरची साडी बॅक अशा कमेंट केल्या आहेत.
अभिनेता अजिंक्य देव यांनी फोटो शेअर केलेल्या फोटोत अलका कुबल, लोकेश गुप्ते, पुजा सावंत, दिसत आहेत
अभिनेत्री अलका कुबल ह्या सध्या लंडन मध्ये एका मराठी चित्रपटाच शुट करत आहेत. अभिनेता लोकेश गुप्ते चित्रपटाचे दिगदर्शन करत आहेत. चित्रपटात आतापर्यंत अभिनेत्री अलका कुबल यांच्यासह सिध्दार्थ चांदेकर , पुजा सावंत हे कलाकार मुख्य भुमिकेत आहेत. त्यामुळे ह्या मराठमोळ्या कलाकारांची वारी लंडनमध्ये असली तरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






