Home > Entertainment > मग मी ब्रा का लपवायची? : आलिया भट्ट

मग मी ब्रा का लपवायची? : आलिया भट्ट

मग मी ब्रा का लपवायची? : आलिया  भट्ट
X

आलिया भट तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सध्या खूप चर्चेत आहे नुकताच तिने स्वतः गरोदर असल्याचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट ला शेअर केला होता.


गंगुबाई काठीयावाडी या सिनेमाने आलिया भट ला एक वेगळीच प्रसिद्धी दिली आहे .सध्या तिचा डार्लिंग सिनेमा 5 ऑगस्टला नेटफ्लिक्स वर रिलीज होत आहे. आपल्या सिनेमाबद्दल अनेक ठिकाणी जाऊन बोलत आहे.एका मुलाखतीत आलियाने आपल्या मनातील गोष्टी उघड केल्या आहेत. यावेळी तिने महिलांबद्दल भाष्य केले .अनेक महिलांना दबून राहावं लागतं त्यांच्या कपड्यापासून ते वागण्यापर्यंत लोक त्यांना सल्ले देतात त्यांना मन मोकळं जगता येत नाही.


माझ्यावर सुद्धा फार वाईट पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात पण मी आता त्याकडे लक्ष देत नाही .पण महिलांनी कसं राहावं काय कपडे घालावेत यावर टिप्पणी ही केली जाते .फिल्म इंडस्ट्रीतही सेक्सीझम आहे .आपल्या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी एका मुलाखतीत तिने "महिलांना ब्रा लपवायला सांगितली जाते याचा मला फार राग येतो ते वस्त्रच आहे तर ते लपवायचं का ?त्याउलट पुरुषांना त्यांची अंतर्वसते का लपवायला सांगितली जात नाहीत? "असा रोखठोक सवाल आलिया भटने केला आहे.

Updated : 2 Aug 2022 11:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top