Home > Entertainment > इमरान हाश्मीने सेल्फी साठी खाल्ला मार ?

इमरान हाश्मीने सेल्फी साठी खाल्ला मार ?

इमरान हाश्मीने सेल्फी साठी खाल्ला मार ?
X

इमरान हाश्मीने त्याच्या हटके लूक मुळे चर्चेत असतो. त्याचबरोबर त्याची चित्रपटातील स्टाईल आणि दरवेळचा नवा अंदाज लोकांना भावतो .पण आता "सेल्फी" साठी त्याने मार खाल्ला आहे .अशी कोणाची सेल्फी तो घेत आहे ,तुम्हाला माहित आहे का ? आणि मार का खाल्ला ? इमरान हाश्मीचा नवा चित्रपट येत आहे ."सेल्फी" नावाचा हा चित्रपट ज्यामध्ये तो अक्षय कुमार सोबत काम करणार आहे .

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध झाला आहे.यामध्ये इमरान हाश्मीने एका मुलाच्या वडीलाची भूमिका साकारली आहे .जो अक्षय कुमार म्हणजेच चित्रपटातील सुपरस्टार "विजय "याचा फॅन असतो . तस पाहता या बापलेकांची जोडी हि सुपरस्टार विजयची जबरदस्त फॅन दाखवली आहे . त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी इमरान हाश्मी काहीही करायला तयार असतो . इमरान हाश्मीने यामध्ये पोलीसाची भूमिका स्वीकारली आहे.आपल्या मुलाच्या इच्छेसाठी तो काहीही करायला तयार असतो.

त्यामुळे सुपरस्टार विजयची सेल्फी घेण्यासाठी या चित्रपटात त्याने काय काय केलं आहे हे आपल्याला ट्रेलर पाहायला मिळतं आहे .चित्रपटात सुपरस्टारला गाडीच्या लायसनची गरज असते आणि त्याला लायसन मिळवून देण्यासाठी इमरान हाश्मी प्रयत्न करतो या सगळ्यात सुपरस्टार विजय म्हणजेच अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांची जोरदार भांडण होतात आणि स्टोरी सुरू होते

एक सामान्य पोलीस आणि एक सुपरस्टार यांच्यातील ही लढाई विकोपाला जाते आणि आणि याची पडसाद संपूर्ण जनसमुदायात उमटतात आणि हे सगळं घडत असताना इम्रान हाश्मीचा मुलगा जो सुपरस्टार विजेचा खूप मोठा फॅन असतो तो आपल्या वडिलांना रियल सुपरस्टार मानायला पण या लढाईत कोण जिंकणार हे अजूनही उलघडलं नाहीये त्यासाठी सेल्फी हा इमरान हाश्मी आणि अक्षय कुमार यांचा चित्रपट पाहावा लागेल

पण यामध्ये इमरान हाश्मीची फाईट जोरदार दाखवली आहे.त्याला भरपूर मार पडताना दाखवला आहे .सर्व जनता त्याच्यासोबत आहे .त्यामुळे सामान्य माणसाची ताकद काय असते हे यामधून दाखवण्यात येणार आहे .24 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे .

Updated : 2 Feb 2023 8:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top