Home > Entertainment > मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर 'पृथ्वीराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार ; आज टीझर लॉन्च होणार

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर 'पृथ्वीराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार ; आज टीझर लॉन्च होणार

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर  पृथ्वीराज चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार ; आज टीझर लॉन्च होणार
X

अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता बातमी येत आहे की, अक्षय कुमार लवकरच त्याचा आगामी चित्रपट 'पृथ्वीराज'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर अक्षयसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मानुषी 'पृथ्वीराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान, चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. निर्मात्यांनी 'पृथ्वीराज'च्या टीझरची रिलीज डेट जाहीर केली आहे.

या चित्रपटाचा टीझर आज म्हणजेच १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, "'पृथ्वीराज' हा अक्षय कुमारचा पुढील मोठा रिलीज आहे. त्याचा टीझर १५ नोव्हेंबर २०२१ रोजी रिलीज होणार आहे. 'पृथ्वीराज'मध्ये अक्षय आणि मानुषीशिवाय संजय दत्त, सोनू सूद देखील आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. चित्रपटात अक्षय कुमार 'पृथ्वीराज चौहान' यांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर मानुषी 'संयोगिता'च्या भूमिकेत दिसणार आहे.

Updated : 15 Nov 2021 3:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top