Home > Entertainment > 'बिग बॉस' विजेता अक्षय केळकर याआधी काय करत होता ?

'बिग बॉस' विजेता अक्षय केळकर याआधी काय करत होता ?

बिग बॉस विजेता अक्षय केळकर याआधी काय करत होता ?
X


'बिग बॉस' चा शंभर दिवसांचा प्रवास नुकताच पार पडला. प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती बिग बॉस ४ च्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे प्रेक्षकांना लक्ष लागले होते. १९ स्पर्धकांनपैकी बिग बॉस ४ च्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर हा ठरला. अक्षय पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता.

अक्षय चा जन्म १६ मार्च रोजी ठाण्यातील कळवा येथे झाला. कळव्याच्या सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. आणि कमर्शिअल आर्ट्समध्ये पदवीचे शिक्षण एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट, वांद्रे येथे घेतली आहे. त्याच्या वडीलांचे नाव जयेंद्र केळकर आणि आई चे नाव कल्पना केळकर असे आहे. अक्षय केळकरचे वडील रिक्षा चालक असुन त्यांच्या वडीलांच्या रिक्षातुनच 'बिग बॉस'च्या सेटवर पोहचला होता. या प्रवासातुन तो 'बिग बॉस' चा विजेता झाला. आज त्याच्या आई वडिलांना अक्षयचा नक्कीच अभिमान वाटतं असावा. अक्षयला कला दिग्दर्शक होण्याच स्वप्न होत. त्याने मालिकेत २०१३ साली पहिल पाऊल टाकल. 'बे दुने दहा' ही अक्षयची पहीली मालिका होती. त्यानंतर कमला या मालिकेतुन प्रसिद्ध झाला. त्याने मराठी चित्रपटसृष्टीत सहाय्यक म्हणुन देखील काम केले. मालिकेशिवाय अक्षयने २०१४ ला 'प्रेमासाठी' या चित्रपटातुन मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले. याशिवाय 'कान्हा' या चित्रपटात झळकला. अक्षयने मराठी शिवाय 'भाकरवडी' या हिंदी मालिकेत देखील काम केले आहे.

'बिग बॉस' मराठीच्या या पर्वामध्ये अक्षयला सदस्य म्हणून जाण्याची संधी मिळाली आणि आता तो या पर्वाचा विजेता ठरला. अक्षय केळकर 'बिग बॉस' मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला तर अपूर्वा नेमळेकरने दुसरे स्थान मिळवले. अक्षय केळकरला १५ लाख ५५ हजार रुपये रोख रक्कम मिळाली. पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपये व्हाउचर देखील विजेतेला मिळाले. फनोलेक्स पाइप बेस्ट कॅप्टन ॲाफ सीझनसाठी ५ लाख रुपये देखील अक्षयला मिळाले आहेत. खेळाडूवृत्ती, टास्क मधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला.

Updated : 9 Jan 2023 12:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top