Home > News > अमिताभ, अभिषेक बच्चन यांच्या नंतर ऐश्वर्या आणि आराध्या पॉझिटिव्ह

अमिताभ, अभिषेक बच्चन यांच्या नंतर ऐश्वर्या आणि आराध्या पॉझिटिव्ह

अमिताभ, अभिषेक बच्चन यांच्या नंतर ऐश्वर्या आणि आराध्या पॉझिटिव्ह
X

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नंतर आता ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींच्याही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर जया बच्चन यांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. बच्चन कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाल्याने अमिताभ यांच्या चारही बंगल्यांना आज तडकाफडकी सील करण्यात आले. मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे.

या समंधी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 'श्रीमती ऐश्वर्या राय बच्चन व कन्या आराध्या बच्चन या देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. श्रीमती जया बच्चन जी यांचे टेस्ट निगेटिव्ह आहेत. बच्चन कुटुंबियांची तब्येत तंदुरुस्त व्हावी अशी आमची सदिच्छा आहे.' असं ट्वीट करत म्हटलं आहे.

Updated : 12 July 2020 11:22 AM GMT
Next Story
Share it
Top