Home > Entertainment > Aaradhya Bachchan च्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, नक्की प्रकरण काय?

Aaradhya Bachchan च्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, नक्की प्रकरण काय?

Aaradhya Bachchan च्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, नक्की प्रकरण काय?
X

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या हिने काही यूट्यूब चॅनलविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या यूट्यूब चॅनेलने काही दिवसांपूर्वी आराध्याच्या प्रकृतीबाबत खोट्या बातम्या दिल्या होत्या. आराध्याने तिच्या याचिकेत या वाहिन्यांवर आणि त्यातील मजकुरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 20 एप्रिलला म्हणजेच आजच या प्रकरणी कोर्टात सुनावणी होणार आहे.

आराध्याने काही यूट्यूब चॅनेलवरून तिच्यावर बनवलेले सर्व व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. त्यांनी याचिकेसाठी Google LLC आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पक्षकार बनवले आहे. या याचिकेबाबत बच्चन कुटुंबाकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

16 नोव्हेंबरला आराध्या 11 वर्षांची झाली

आराध्याने 16 नोव्हेंबरला तिचा 11 वा वाढदिवस साजरा केला. या खास निमित्त कुटुंबाने घरी एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. या भव्य पार्टीत बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्व मित्र सहभागी झाले होते. रितेश देशमुख पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा आणि मुलांसह पार्टीत पोहोचले होते. याशिवाय ९० च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेही दिसली होती..

Updated : 20 April 2023 1:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top