Home > Entertainment > जातिवाचक वक्तव्यप्रकरणी अभिनेत्री युविका चौधरी पोलिसांना शरण, मात्र...

जातिवाचक वक्तव्यप्रकरणी अभिनेत्री युविका चौधरी पोलिसांना शरण, मात्र...

जातिवाचक वक्तव्यप्रकरणी अभिनेत्री युविका चौधरी पोलिसांना शरण, मात्र...
X

अनुसूचित जाती जमातीविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य करून अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री युविका चौधरी (Yuvika Chaudhary) सोमवारी हरियाणाच्या हांसी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली होती. पोलिसांनी तिला औपचारिकरित्या अटक करून हांसी येथील डीएसपी कार्यालयात बसून ठेवले. पोलिसांनी तिची 3 तास चौकशी केली आणि त्यानंतर तिला जामीन मिळाला.

खरं तर, 25 मे रोजी, युविका हिने तिच्या ब्लॉगमध्ये एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि अनुसूचित जातींवर अपमानास्पद वक्तव्य केलं. त्यानंतर दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी अभिनेत्रीविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट कायद्याअंतर्गत हांसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

आपल्याविरोधात दाखल झालेला खटला रद्द करण्यासाठी युविका ने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती न्यायालयाने फेटाळली. यानंतर तिने विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता, जो न्यायालयाने फेटाळला होता. नंतर उच्च न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन दिला आणि तपासात सहभाग होण्याचे आदेश दिले.

सोमवारी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, युविका ही हांसी पोलिस स्टेशनमध्ये शरण आली. यावेळी तिच्यासोबत 10 बाउन्सर आणि तिचा पती प्रिन्स नरुलाही उपस्थित होते. या प्रकरणी युविकाला अटकही करण्यात आली आणि तिची चौकशीही करण्यात आली. नंतर तिला जामीनपत्र भरून जामीन मंजूर करण्यात आला.Actress Yuvika Chaudhary surrenders to police in case of racist statement

Updated : 19 Oct 2021 3:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top