बँड बाजा वरात, अभिज्ञा भावेही लग्न बंधनात!
X
कोरोनाचा लॉकडाउन जसा संपला तसा लग्नसराईला जोर दार सुरूवात झाली. कोरोनाच्या संसर्गामुळे लग्नात येणाऱ्या वऱ्हाडी पाहुण्यांवर निर्बंध आले, पण वऱ्हाडी मंडळींच्या उत्साहात मात्र कमतरता आली नाही. कोरोनाचा चढउतार पाहिल्या नंतर अनेक जोडप्यांनी लग्नगाठ बांधली. सामान्य कुटुंब ते बॉलीवुड, क्रिकेटर आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या सेलिब्रिटींनीसुध्दा लग्नाची गाठ बांधली आहे.
शाश्वती पिंपळकर, शर्मिष्ठा राऊत, कार्तिकी गायकवाड या मराठी अभिनेत्रींनी लॉकडाऊन नंतर लग्नगाठ बांधल्यानंतर 'खुलता कळी खुलेना' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिज्ञा भावेनेही लग्नगाठ बांधली आहे. अभिज्ञा, मेहुल पैसोबत विवाह बंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. अभिज्ञा आणि मेहुलची जोडी अतिशय सुंदर दिसत आहे.
काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अभिज्ञा आणि मेहुलचा विवाहसोहळा पार पडला आहे. मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात अभिज्ञा भावेचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिज्ञाच्या लग्नाची बातमी समजताच चाहत्यांनी या नवविवाहीतांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या फोटोंमध्ये अभिज्ञा मेहुलशी विवाह बंधनात अडकल्यानंतर फार आनंदी दिसत आहे. लग्नात तिने परिधान केलेला विवाह जोडाही लोकांना आवडलाय.
अभिज्ञाने आजपासून तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अभिज्ञा भावे वधू वेषात अतिशय सुंदर दिसत आहे. या दोघांनी गुलाबी रंगाचे कपडे घातले आहेत. अभिज्ञा भावेचा नवरा मेहूल पै मुंबईत राहतो. ऑक्टोबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. तिच्या साखरपुड्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.