Home > Entertainment > मिताली, सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात!

मिताली, सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात!

मिताली, सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात!
X

मराठी सिनेसृष्टीत सध्या कलाकारांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. कार्तिकी गायकवाड, शर्मिष्टा राऊत, अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णी, मानसी नाईक यांच्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतले क्युट कपल म्हणून ओळखले जाणारी जोडी म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा विवाह सोहळा नुकताच पुण्यात मोठ्या थाटामाटात पार पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. आज त्यांचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या नव दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पुण्यातील ढेपे वाड्यात सिद्धार्थ आणि मिताली विवाहबद्ध झाले. या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्री अभिज्ञा भावे तिच्या पतीसोबत या विवाबसोहळ्यात सहभागी झाली होती. तर पूजा सावंत, भूषण प्रधान हे देखील सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाला आले होते.

पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीनं सिद्धार्थ-मितालीचा विवाह पार पडला. मितालीनं हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती, तर सिद्धार्थनं निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंन्टाइन्स डेच्या दिवशी सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि मिताली यांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर दोघांचा साखरपुडा पार पडला होता.

Updated : 25 Jan 2021 6:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top