Home > Entertainment > आशुतोष चढला बोहल्यावर!

आशुतोष चढला बोहल्यावर!

आशुतोष चढला बोहल्यावर!
X

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अभिज्ञा भावे पाठोपाठ आता अभिनेता आशुतोष कुलकर्णीही अडकला लग्न बंधनात.

लॉकडाउन संपल्यानंतर लगिन सराई अगदी जोरदार सुरू झाली आहे. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. गायिका कार्तिकी गायवाड, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, शाश्वती पिंपळकर आणि अभिज्ञा भावे पाठोपाठ आता 'गंध फुलांचा गेला सांगून' मालिकेत काम करणारा अभिनेता आशुतोष कुलकर्णीही लग्नाच्या बोहल्यावर चढला आहे.

आशुतोषनं नुकतंच त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ८ जानेवारी २०२१ रोजी अभिनेत्री रुचिका पाटीलशी लग्न केले. आशुतोष आणि रुचिका यांच्या लग्नसोहळ्याला अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. आशुतोषनं त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेत आहेत. अनेकांनी फोटोवर कमेंट करत त्याला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated : 13 Jan 2021 12:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top