Home > Entertainment > गदर-2 , ओएमजी 2 आणि जेलरला घूमर टक्कर देणार का?

गदर-2 , ओएमजी 2 आणि जेलरला घूमर टक्कर देणार का?

गदर-2 , ओएमजी 2 आणि जेलरला घूमर टक्कर देणार का?
X

अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर स्टारर चित्रपट घूमर रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ 85 लाखांची कमाई करू शकला. मात्र, गदर 2, ओएमजी आणि जेलरच्या क्रेझमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

घूमर हा आर बाल्की दिग्दर्शित स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. सैयामी खेर या चित्रपटात क्रिकेटरची भूमिका साकारत आहे तर अभिषेक बच्चन प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील तिच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यापूर्वी सैयामीचा रस्ता अपघातात तिचा हात गमवावा लागतो पण त्यानंतर प्रशिक्षकाला भेटल्यानंतर सैयामीचे आयुष्य बदलते अशी एकंदरीत या चित्रपटाची स्टोरी आहे.

घूमर रिलीजच्या पहिल्या आठवड्यात चांगली कमाई करू शकतो...

या चित्रपटाला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. या चित्रपटातील अभिषेक बच्चन आणि सैयामीच्या अभिनयाचेही कौतुक झाले. त्यानुसार येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे. सनी देओलच्या गदर-2 आणि अक्षय कुमार, पंकज त्रिपाठीच्या ओएमजी 2 आणि रजनीकांतच्या जेलरमधून चित्रपटगृहांमध्ये प्रचंड स्पर्धा चालू आहे...

Updated : 20 Aug 2023 4:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top