Home > Entertainment > आराध्या बच्चनचा व्हिडीयो व्हायरल, आजोबांप्रमाणे नातीचंही हिंदीवर प्रभुत्व!

आराध्या बच्चनचा व्हिडीयो व्हायरल, आजोबांप्रमाणे नातीचंही हिंदीवर प्रभुत्व!

महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन हिचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ती अस्खलित हिंदी बोलताना पहायला मिळतेय.

आराध्या बच्चनचा व्हिडीयो व्हायरल, आजोबांप्रमाणे नातीचंही हिंदीवर प्रभुत्व!
X

बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या ही तिच्या जन्मापासूनच सेलिब्रीटी झालीये. तिने काहीही केले की त्याची बातमी झालीच म्हणून समजा.. त्या आराध्याने अजूनही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही आणि तरी देखील तिची लोकप्रियता कोणत्याही कलाकारापेक्षा कमी नाहीये. गेल्या काही दिवसांपासून आराध्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आराध्या हिंदी आपली राजभाषा आहे असं सांगताना दिसतेय. हा संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर आराध्याचं हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आराध्या बच्चनचा हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर असलेल्या फॅन पेज अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ आराध्याने शाळेसाठी केलेला आहे. ती धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय विद्यालयात चौथी इयत्तेत शिकतेय. तर ट्विटरवर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिचे भाषेवर असलेले प्रभुत्व हे आजोबा अमिताभ आणि पणजोबा हरिवंश राय बच्चन यांच्यामुळे असल्याचं म्हटले आहे. हरिवंश राय हे एक लोकप्रिय कवी आणि अमिताभ बच्चन यांचे वडील आहेत.

Updated : 14 March 2022 12:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top