Home > Entertainment > Shehnaaz Gill पुन्हा एकदा हटके अंदाजमध्ये..

Shehnaaz Gill पुन्हा एकदा हटके अंदाजमध्ये..

Shehnaaz Gill पुन्हा एकदा हटके अंदाजमध्ये..
X

शहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill) आजकाल तिच्या 'किसी का भाई किसी की जान' या डेब्यू चित्रपटासाठी खूप उत्साहित आहे. सध्या ती सतत चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. याच संदर्भात आज ती मुंबईती (Mumbai) मेहबूब स्टुडिओबाहेर दिसली, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये शहनाजचा ग्लॅमरस लूक दिसत आहे. नक्की काय आहे हा व्हिडिओ पाहुयात..

ऑल ब्लॅक लूकमध्ये स्पॉट..

व्हिडिओमध्ये शहनाज ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली होती. तिने या लुकला सोनेरी दागिने आणि काळ्या टाचांनी चप्पल घातली आहे. यादरम्यान तिने हसत हसत पापाराझींना पोजही दिली.

किसी का भाई किसी की जानची स्टारकास्ट..

सलमान खान (Salman Khan) प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान' हा फरहाद सामजी दिग्दर्शित आहे. सलमान व्यतिरिक्त चित्रपटात पूजा हेगडे व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जगपती बाबू, विजेंदर सिंग, पलक तिवारी आणि जस्सी गिल यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्स पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Updated : 19 April 2023 1:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top