Home > Entertainment > 72 वर्षीय रजनीकांतने धरले 51 वर्षांच्या योगी आदित्यनाथ यांचे पाय

72 वर्षीय रजनीकांतने धरले 51 वर्षांच्या योगी आदित्यनाथ यांचे पाय

72 वर्षीय रजनीकांतने धरले 51 वर्षांच्या योगी आदित्यनाथ यांचे पाय
X

भारतीय चित्रपट सृष्टीतले सुपरस्टार रजनीकांत वयाच्या ७२ व्या वर्षीही चित्रपटा हिरोचीच भुमिका साकारतात. रजनीकांत यांचा चित्रपट म्हटलं की तो सुपरहिट होणारच हे आजवरचं समीकरण आहे. चित्रिकरण असो की चित्रपटाचं प्रमोशन असो पूर्वीच्याच उर्जेनं रजनीकांत आजही कार्यरत आहेत. रजनीकांत यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आजही सांगितले जातात. मात्र, हेच रजनीकांत सध्या सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहेत.

जेलर (Jailer) हा रजनीकांत यांचा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या अनुषंगानं सध्या रजनीकांत सर्वत्र फिरत आहेत. याच दरम्यान त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी रजनीकांत आपल्या कारमधून उतरले. त्यांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथ दरवाजापर्यंत आले. योगी आदित्यनाथ येताच रजनीकांत यांनी त्यांना वाकून नमस्कार करत त्यांच्या पाया पडले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिवाय रजनीकांत ट्रोलही होत आहेत. या भेटी दरम्यान रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांना जेलर हा चित्रपटही दाखवला. योगी आदित्यनाथ यांनी रजनीकांत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केलं.

जेलर फिल्म एक एक्शन थ्रीलर चित्रपट आहे. हा चित्रपट नेल्सन दिलीपकुमार यांनी दिग्दर्शित केलाय. रजनीकांत यांच्यासोबतच विनायकन, राम्या कृष्णन, वसंत रवी, सुनील, योगी बाबू हे कलाकारांनीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलीय.

Updated : 20 Aug 2023 4:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top