Home > Entertainment > सरफरोश' चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण ! अभिनेत्री सुकन्या मोनेंची खास पोस्ट

सरफरोश' चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण ! अभिनेत्री सुकन्या मोनेंची खास पोस्ट

सरफरोश चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण ! अभिनेत्री सुकन्या मोनेंची खास पोस्ट
X

जॉन मॅथ्यू मॅथन दिग्दर्शित ' सरफरोश' चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या ' सरफरोश' चित्रपटात अभिनेता अमिर खान, सोनाली बेंद्रे, नसारुद्दीन शाह, मकरंद देशपांडे, नवाजुद्दीन सिद्दीकी, स्मिता जयकर, मनोज जोशी, आकाश खुराना, गोविंद नामदेव, अशोक लोखंडे, सुकन्या मोने असे तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील गाणी सुद्धा सुपरहिट झाली होती.

अजूनही प्रेक्षक आवडीने 'सरफरोश' चित्रपट पाहतात व त्यातील गाणी देखील एकतात. 'सरफरोश चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने नुकताच चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने उपस्थिती लावली होती.

मराठीतील सध्या आघाडीच्या अभिनेत्री सुकन्या मोनेंनी देखील ‘सरफरोश' चित्रपटाच्या खास शोला हजेरा लावली होती. यासंदर्भातील त्यांनी एक नुकतीच पोस्ट शेअर केली गेली आहे. त्यामध्ये अमिर खान , सोनाली ब्रेंद्रेंबरोबरचे फोटो शेअर करत सुकन्या मोनेंनी लिहिलं आहे. " कालचा दिवस खास होता... माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं होतं... आपण एखादा चित्रपट करतो आणि काही वर्षांनी तो गतस्मृतीत जातो... पण 'सरफरोश' हा सगळ्याच दृष्टीने माझ्यासाठी विशेष उल्लेखनिय चित्रपट आहे.

तसेच सुकन्या मोने हेही म्हणाल्या अमिर खान माझा लाडका अभिनेता, त्याचबरोबर काम करण्याची संधी मला मिळणार होती. आणि जॉन मॅथ्यू मॅथनची पहिली भेट… दिल्लीतले चित्रीकरण...माझी, सोनालीची आणि स्मिता जयकरची झालेली घट्ट मैत्री… तसेच आम्ही केलेली धमाल त्या चित्रपटाला काल २५ वर्षे झाली आणि त्यानिमित्ताने @radionasha ने खास शो थँक्यू सो मच @rotalks… त्यानिमित्ताने झालेलं रीयूनियन…” सगळ्या जुन्या आठवणी शुटिंग दरम्यान झालेल्या गमती जमती... इतक्या वर्षांनी सोनालीने मारलेली घट्ट मिठी... आमिरचं मराठी बोलणं, वागण्यातला आपलेपणा, काळजी... मनोज जोशींची भेट जॉन आणि आभाचे अगत्याचे आमंत्रण... जॉनचा साधेपणा… त्याच्या कुटुंबाचा आपलेपणा… भारवून गेले होते… पुन्हा पुन्हा भेटत राहू सोनाली बेंद्रे, स्मिता जयकर, जॉन मॅथ्यू मॅथन, आमिर खार, मनोज जोशी, मकरंद देशपांडे…. पुन्हा एकदा धन्यवाद... ’सरफरोश २’ चित्रपटाची आता वाट पाहतेय"

Updated : 11 May 2024 12:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top