Home > Entertainment > सलमान खानला साप चावल्यानंतर आतापर्यंतच्या 10 अपडेट्स

सलमान खानला साप चावल्यानंतर आतापर्यंतच्या 10 अपडेट्स

सलमान खानला साप चावल्यानंतर आतापर्यंतच्या 10 अपडेट्स
X

सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हे नेहमीच चर्चेत राहणारे व्यक्तीमत्व आहे. दरवर्षी २७ डिसेंबर रोजी त्याचा वाढदिवस तो आपल्या कुटूंबीय व मित्र परिवारासह पनवेल तालुक्यातील वाजेपुर येथे त्याच्या मालकीचे असलेले अर्पिता फार्म हाऊसमध्ये साजरा करतो. यावेळी बिग सेलिब्रेटी उपस्थित असतात.

वाढदिवसाच्या तयारी निमित्त सलमान खान आपल्या फार्म हाऊसवर काही दिवस अगोदर ठाण मांडून असतो. यंदाही सलमान खान हा नुकताच आपल्या फार्म हाऊसवर राहण्यासाठी आला होता.


शनिवारी रात्री ३ वाजता त्याला सर्पदंश झाल्याने एकच धावपळ उडाली.


वाजेपुर येथील फार्म हाऊस परिसर डोंगर आणि जंगलाने वेढलेला आहे. परिसरात अनेकदा साप आणि अजगर येतात.


सलमान खानला त्याच्या कुटूंबीय व सुरक्षा रक्षकांनी तातडीने पहाटे ३ वाजता कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले.


याच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा भला मोठा ताफा तैनात करण्यात आला.


सकाळी ९ वाजता सलमान खानला घरी सोडण्यात आले. सलमान खान यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या चाहत्यांनी कोणतीही काळजी करू नये अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.Updated : 26 Dec 2021 10:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top