डिसेंबर हॉलिडे ट्रॅव्हल: सोलो महिला Travellers साठी महाराष्ट्रातील BEST ठिकाणं
थंड हवा, शांत निसर्ग आणि सुरक्षितता—डिसेंबरमध्ये महिलांनी नक्की अनुभवावेत असे महाराष्ट्रातील अनोखे ट्रॅव्हल स्पॉट्स
X
डिसेंबर म्हणजे थंडीच स्वर्गसमान वातावरण. थंडी अंगावर अगदी सुखदपणे येते, डोंगररांगा धुक्याने झाकलेल्या दिसतात आणि समुद्रकिनारेही उन्हामुळे तप्त नसतात. अनेक महिलांसाठी हा महिना कामाचा स्ट्रेस कमी करण्याचा, स्वतःला वेळ देण्याचा आणि ‘मी-टाईम’ घालवण्याचा परफेक्ट काळ असतो.
सोलो ट्रॅव्हलची भीती अनेक महिलांच्या मनात असते, पण महाराष्ट्रातील काही ठिकाणं अशी आहेत जिथे सुरक्षा, स्वच्छता, लोकांची मदतशीर वृत्ती आणि सहज उपलब्ध होणारी सोय यामुळे प्रवास अत्यंत सुखद होतो.
1) महाबळेश्वर — स्त्री प्रवाशांसाठी सर्वात सुरक्षित हिल स्टेशन
का जावं?
डिसेंबरमध्ये महाबळेश्वरची थंडी एकदम गुबगुबीत असते—ना झोंबणारी, ना बोचरी. हवा स्वच्छ, रस्ते सुरक्षित, आणि बहुतेक स्पॉट्सवर दिवसभर लोक असतात यामुळे महिलांसाठी एकटं फिरणं खूप सहज आणि आरामदायी होतं.
काय पाहावं?
• मॅपरो गार्डन
• आर्थर सीट पॉइंट
• व्हेना लेक बोटिंग
• एलीफंट हेड पॉइंट
• ओल्ड महाबळेश्वर मंदिरं
महिला प्रवाशांसाठी टिप्स:
• सकाळी लवकर व्ह्यू पॉइंट्सला जा—सूर्योदय जादुई दिसतो.
• नाईट ट्रॅव्हल टाळा.
• हॉटेलमध्ये आधीच ऑनलाइन बुकिंग करा, विशेषतः विकेंडला.
2) लोणावळा – छोटी, सुरक्षित आणि अतिशय manageable ट्रिप
का जावं?
लोणावळा ही अगदी "इझी गोइंग जागा’ म्हणून प्रसिद्ध आहे. एक दिवस किंवा दोन दिवसातही सहज फिरून होतं. सोयीची वाहतूक, सुरक्षित रस्ते आणि फोन नेटवर्क छान मिळतं. Women-solo travellers साठी हा परफेक्ट beginning spot आहे.
काय पाहावं?
• टायगर पॉइंट
• भुशी धरण
• कार्ला-भाजे लेणी
• ड्यूक नोज पॉईंट
• भुशीचे जंगल ट्रेल
खास:
लोणावळ्यात महिलांसाठी women-friendly homestays, clean hostels आणि सुरक्षित resorts मिळतात.
3) दापोली — शांत समुद्रकिनारे आणि लो-क्लटर व्हाइब
का जावं?
पुणे किंवा मुंबईच्या गर्दीमधून थोडं दूर जाऊन ‘समुद्र + शांती’ हवी असेल तर दापोली भन्नाट पर्याय आहे. इथे beach stretch खूप मोठा आहे, त्यामुळे एकटं चालायला, बसून wave बघायला, लिहायला किंवा sketch करायला खूप छान.
काय पाहावं?
• मुरुड बीच
• कार्दे बीच
• हरणे बंदर
• परशुराम मंदिर
• पन्हाळे लेणी
• सुख सागर पॉइंट
महिला सुरक्षा टिप:
• नाईट बीच वॉक avoid.
• स्थानिक लोक खूप मदत करणारे आहेत, पण offbeat भागांमध्ये उशिरा जाऊ नका.
४) नाशिक — धार्मिक + आधुनिक vibe
का जावं?
नाशिक हे clean, organised आणि सुरक्षित शहर. डिसेंबरमध्ये गर्दी कमी असते आणि वाईन यार्ड्सचा सीझन सुरू असतो. महिलांसाठी हा शहर-ट्रॅव्हल + निसर्ग अनुभवाचा अनोखा कॉम्बिनेशन आहे.
काय पाहावं?
• सुला वाईनयार्ड
• गंगापूर धरण
• पंचवटी
• काळाराम मंदिर
• अंजनेरी
plus point:
लोकल ट्रान्सपोर्ट खूप सोप्पे आहेत —auto, cab, buses.
5) गणपतीपुळे — शांत समुद्र, स्वच्छ बीच
का जावं?
गणपतीपुळे हे महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ beach destination आहे. येथे रात्रीचा गोंधळ नसतो आणि सकाळीचे सूर्योदय-सुर्यास्त अविस्मरणीय असतात.
काय पाहावं?
• गणपतीपुळे बीच
• प्राचीन स्वयंभू गणपती मंदिर
• आरे-वारे बीच
• प्राचीन धनगरवाडा
Solo-tip:
बीच हॉटेल्सचे balconies sunrise-friendly असतात—सकाळी एकटीने चहा घेत बसणं हा थेरपीसारखा अनुभव मिळतो .
सोलो travellingची सुरुवात करण्यासाठी ही ठिकाणे अगदी सुरक्षित आणि सुंदर आहेत.






