Home > Entertainment > तेजश्री प्रधान पुन्हा नव्या भूमिकेत, येणार नवीन मालिका...

तेजश्री प्रधान पुन्हा नव्या भूमिकेत, येणार नवीन मालिका...

X

तेजश्रीला आपण आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमधुन पाहिलंय. अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेनंतर ती कुठल्याही मालिकेत झळकली नाही. पण आता ती नव्या मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच एका मालिकेतून भेटीस येणार आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर दिसणार असून याबाबत अजून अधिकची माहिती देण्यात आलेली नाही. नुकताच तेजश्रीने याच्या संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तेजश्रीने हा व्हिडीओ शेअर करत म्हंटले आहे कि, "आपली मराठी परंपरा, आपला मराठी प्रवाह. येस. बरोब्बर ओळखलं. मी येतेय आपल्या लाडक्या स्टार प्रवाहच्या नव्या कोऱ्या मालिकेतून. खास तुमच्या भेटीसाठी आता मालिकेचं नाव, तारीख, वेळ काय ही सगळी उत्सुकता पूर्ण होणार आमच्या नव्या कोऱ्या मालिकेतून. पण त्यासाठी तुम्ही बघत राहा आपलं स्टार प्रवाह.. असा व्हिडीओ तेजश्रीने शेअर केलाय..

Updated : 28 July 2023 5:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top