Latest News
Home > क्लासरूम > शेतकरी आंदोलन : मुलांच्या शैक्षणीक नुकसानाला केंद्र सरकार जबाबदार?

शेतकरी आंदोलन : मुलांच्या शैक्षणीक नुकसानाला केंद्र सरकार जबाबदार?

सध्या दिल्लीतील सिंघू बॉर्डरवरती शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशाचा बळी राजा रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलनामुळे ‘दिल्लीकरांचे हाल होत आहेत, स्थानिकांना अडचणी येत आहेत’ अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या. त्यामुळे आजूबाजुच्या परिसरात शाळांची काय परिस्थिती आहे? विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर या आंदोलनाचा परिणाम होतोय का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी.

शेतकरी आंदोलन : मुलांच्या शैक्षणीक नुकसानाला केंद्र सरकार जबाबदार?
X

सध्या दिल्लीतील सिंघू बॉर्डरवरती शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशाचा बळी राजा रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलनामुळे 'दिल्लीकरांचे हाल होत आहेत, स्थानिकांना अडचणी येत आहेत' अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या. त्यामुळे आजूबाजुच्या परिसरात शाळांची काय परिस्थिती आहे? विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर या आंदोलनाचा परिणाम होतोय का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी.

या संदर्भात बोलताना शाळेच्या मुख्याध्यापीका सोनीया म्हणाल्या की, "हि शाळा हरियाणा सिमेवर असल्याने मुलांचे पालक आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ते आपल्या मुलांना वेळ देवु शकत नाहीत. आम्ही मुलांना ऑनलाइन शिकवायचो पण आता तो मोबाईल पालक आंदोलनात नेत असल्याने मुलांची गैरसोय होतेय."

"आधी लॉकडाउन आणि त्यानंतर लगेचच हे आंदोलन आल्याने त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतोय. यात ना पालकांची चुक आहे आणि ना मुलांची. पालक आपल्या भविष्यासाठी आपल्या हक्कांसाठी लढत आहेत."

त्यामुळे आता मुलांच्या शैक्षणीक नुकसानाला जबाबदार कोण? परिस्थिती की पालक? हे प्रत्येकाच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे.


Updated : 22 Dec 2020 1:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top