Home > क्लासरूम > COVIDE-19 : मुलींचं शिक्षण आणि पालकांची मानसिकता

COVIDE-19 : मुलींचं शिक्षण आणि पालकांची मानसिकता

COVIDE-19 : मुलींचं शिक्षण आणि पालकांची मानसिकता
X

सध्या करोनाचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रावर मोठ्याप्रमाणात होत असून त्याची चर्चा सर्वत्र आहे. परंतु या करोना महामारीच्या संकटात आदिवासी, भटक्या-विमुक्त, मजूर या वर्गातील मुलींच्या शिक्षणाला फुलस्टॉप लागण्याची दाट शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे हातचे रोजगार गेले आता पोटाची खळगी भरण्यासाठी पालकांची मानसिकता ही मुलींच्या शिक्षणावर गदा आणू शकते. जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर असलेल्या आश्रमशाळा आणि वसतीगृह बंद आहेत. कदाचित सुरु जरी झाल्यातरी मुली कशा जाणार असा प्रश्न निर्माण होतो. करोनाचा किती गंभीर परिणाम मुलींच्या शिक्षणावर होऊ शकतो आणि त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत सांगतायेत दारिद्र्याची शोधयात्रा या पुस्तकाचे लेखक हेरंब कुलकर्णी... पाहा हा व्हिडिओ.

आर्थिक ताण-तणावांचा परिणाम हा मुलींचे बालविवाह होण्यात होणार आहे. त्यामुळे आदिवासी भटके विमुक्त व गरीब कुटुंबातील मुलींच्या बालविवाहाच्या प्रमाणात होणारी वाढ हीच सर्वात मोठी समस्या असणार आहे. आदिवासी, भटक्या विमुक्त्या समाजातील मुलींचा शाळा प्रवेशासाठी शेवटचा क्रमांक असतो आणि शाळेतून काढताना पहिला क्रमांक असतो ही वस्तुस्थिती आहे. यात पालकांची मानसिकता महत्वाची आहे. खरंतर लॉकडाऊननंतर ग्रामीण भागातील पालक आणि मुलींसमोर कोणती आव्हानं, त्यांची स्थिती कशी असेल हे दारिद्र्याची शोधयात्रा या पुस्तकाचे लेखक हेरंब कुलकर्णी यांनी मांडली आहे.

Updated : 25 Jun 2020 7:32 AM GMT
Next Story
Share it
Top