Home > क्लासरूम > भगतसिंह, राजगुरुंसह कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख, काय आहे प्रकरण?

भगतसिंह, राजगुरुंसह कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख, काय आहे प्रकरण?

भगतसिंह, राजगुरुंसह कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख, काय आहे प्रकरण?
X

कोणत्याही इयत्तेचा अभ्यासक्रम तयार करताना गाभाभूत घटकांचा विचार केला जातो. यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, भारताचा सामाईक सांस्कृतिक वारसा, स्त्री पुरुष समानता, पर्यावरणाचे संरक्षण अशा घटकांचा विचार केला जातो.

याचाच विचार करता भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास या घटकाअंतर्गत बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या बालभारतीच्या पुस्तकात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी हौतात्म्य पत्करलं. हा इतिहास सांगताना पुस्तकात सुखेदव यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेले असा उल्लेख करण्यात आला आहे.

ब्राह्मण महासंघाने यावर आक्षेप घेतला आहे. हा सुखदेव यांचाच नव्हे तर समस्त क्रांतिकारकांचाच अपमान असल्याचं ब्राह्मण महासंघाचे दवे यांनी म्हटलं आहे. ब्राह्मण महासंघाने महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून एवढी गाढव चूक अपेक्षित नाही. अशी टीका करताना ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधितांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

काय आहे वाक्य?

"देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम हवे, होय ना?"

"बरोबर आहे" मुले म्हणाली.

एक मुलगा म्हणाला, "भगतसिंह, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते"

मी विचारले "ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी…

या धड्यात एका व्यक्तीच्या तोंडातून हे वाक्य बाहेर पडलेले आहे. हा व्यक्ती मुलांना देशप्रेमाबद्दल समजावून सांगत आहे. हा संवाद या धड्यात देण्यात आला असून एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सदर उल्लेख करण्यात आला आहे.

यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा या पुस्तकातून हा धडा घेण्यात आलेला आहे. यदुनाथ थत्ते हे प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार आहेत.

कोण अब्दुल रसूल कुर्बान हुसेन?

भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी देशासाठी हौतात्म्य स्विकारलं त्याच वेळी म्हणजे १९३१ मध्ये अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांनाही इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून फासावर चढवलं होतं. कुर्बान हुसेन हे सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी सोलापूरमध्ये त्या काळी वृत्तपत्र सुरू केले होते.

या संदर्भात बोलताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

2018-19 साली प्रचलित कार्यपद्धतीनुसार मुख्य समन्वयक प्राची रवींद्र साठे यांच्या कार्यकाळात पुस्तकाची निर्मिती झाली आहे. तर ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक यदुनाथ थत्ते यांच्या लेखातून हा पाठ्यक्रम समाविष्ट करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच इतिहासाच्या पुस्तकात सुखदेव यांचा उल्लेख असल्याचंही त्यांनी सांगितलं. "साधारण दहा वर्षानंतर पाठ्यक्रम बदलला जातो. मात्र लवकरच केंद्राची नवीन एज्युकेशन पॉलिसी येणार आहे, त्यानंतर NCRTE च्या माध्यमातून याविषयी राज्य सरकार निर्णय घेईल. तसंच सोलापूरच्या कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, मलप्पा जनशेट्टी आणि किसन सारडा या चार हुतात्म्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे. त्यामुळे यात मुस्लीम आणि हिंदू असा भेद करणं चुकीचं आहे,"

बालभारतीचं स्पष्टीकरण...

दरम्यान बालभारतीने या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. ‘बालभारती इयत्ता आठवीच्या मराठी भाषा विषयाच्या पुस्तकातील ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’. या पाठाच्या अनुषंगाने स्वातंत्र्य सेनानी यांचा उल्लेख चुकीने अंतर्भूत करण्यात आला असून क्रांतिकारक सुखदेव यांचे नाव वगळण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.’

Updated : 17 July 2020 11:14 PM GMT
Next Story
Share it
Top