Home > क्लासरूम > 9 वी, 11 वी तील नापास विद्यार्थ्यांना सरकारचा ‘वन मोअर चांन्स’

9 वी, 11 वी तील नापास विद्यार्थ्यांना सरकारचा ‘वन मोअर चांन्स’

9 वी, 11 वी तील नापास विद्यार्थ्यांना सरकारचा ‘वन मोअर चांन्स’
X

नववी आणि अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांनादेखील दहावी आणि बारावीत प्रवेश मिळू शकतो. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तोंडी परीक्षा घेऊन यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्या. राज्य सरकारने या विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षांमधील गुणांच्या सरासरीनुसार त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, यातही काही नापास झाल्याचं समोर आलं. यावर उपाय म्हणून या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगीतलं.

या संदर्भात सरकारने शासन निर्णय काढला असून यात, शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता 9वी आणि इयत्ता 11वीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चालू वर्षात तोंडी पुनर्परीक्षेची संधी देण्यात यावी. राज्यात कोविड-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन सदर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची दिनांक 7 ऑगस्ट 2020 पर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष बोलावून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित शाळांनी तोंडी परीक्षा घेण्यात यावी. असं म्हटलेलं आहे.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/720934672095707/

Updated : 24 July 2020 7:21 AM GMT
Next Story
Share it
Top