Home > बिझनेस > दोन दिवसानंतर शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 150 अंकांनी वधारला..

दोन दिवसानंतर शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 150 अंकांनी वधारला..

दोन दिवसानंतर शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 150 अंकांनी वधारला..
X

दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार आज तेजीत आहे. सेन्सेक्स 150 अंकांच्या वाढीसह 58,491 वर पोहोचला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स आज सकाळी 23 अंकांनी घसरून 58,363 वर उघडला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज ३.५१% वर आहे. त्याची मार्केट कॅप आज 46 हजार कोटींनी वाढून 15.45 लाख कोटी झाली आहे.

13 समभागात घसरण

सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 13 समभाग घसरणीत आहेत तर 17 समभाग वधारत आहेत. घसरलेल्या समभागांमध्ये बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे. वाढत्या समभागांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, इन्फोसिस आणि टायटन यांचा समावेश आहे. मार्केट कॅप 263.29 लाख कोटी रुपये आहे.

रिलायन्सचे शेअर्स वाढले

रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर, जो सतत ढासळत आहे, तो आज 3.5% वाढला आहे. . पेटीएमच्या शेअरमध्ये तिसऱ्या दिवशीही वाढ होत आहे. Paytm चे शेअर्स आज 5% वर आहे. Nykaa चा स्टॉक 4% वर आहे. पेटीएमचा स्टॉक तीन दिवसांत जवळपास ३०% वाढला आहे. तो सूचीबद्ध किंमतीपेक्षा कमी असून आज रु. 1841 वर आहे. तर लिस्ट 1950 रु. त्याची इश्यू किंमत 2,150 रुपये होती. त्याची मार्केट कॅप 1.18 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

निफ्टीही तेजीत

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी आज 17,413 वर उघडला. त्याने 17,430 ची उच्च तर 17,375 ची निम्न पातळी बनवली. सध्या तो 54 अंकांच्या वाढीसह 17,414 वर व्यवहार करत आहे. त्याच्या 50 समभागांपैकी 21 नफ्यात आहेत तर 28 घसरत आहेत. निफ्टी मिडकॅप इंडेक्स, निफ्टी बँक आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये घसरण होत आहे.

Updated : 25 Nov 2021 7:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top