Home > बिझनेस > जेव्हा महिला जागृत होतात तेव्हा कुटुंब जागृत होतं – नीता अंबानी

जेव्हा महिला जागृत होतात तेव्हा कुटुंब जागृत होतं – नीता अंबानी

जेव्हा महिला जागृत होतात तेव्हा कुटुंब जागृत होतं – नीता अंबानी
X

रिलाईन्स फाऊंडेशनच्या चेयरपर्सन नीता यांनी देशातील लैगींक विषमता संपविण्यासाठी ‘यूनाइटेड स्टेट एजेंसी फॉर इंटरनेशनल डेव्हलपमेंट’ म्हणजेच USAID सोबत हातमिळवणी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि एडवाइजर इवांका ट्रम्प मुख्य पाहुण्या म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

या कार्यक्रमात बोलताना नीता अंबानी म्हणाल्या की, “मला ही घोषणा करताना अत्यानंद होत आहे आणि गर्व आहे की USAID सह संयुक्तपणे रिलाईस फाउंडेशन आणि W-GDP काम करीत आहेत. आम्ही 2020 मध्ये भारतभरात एकत्रित डब्ल्यू-जीडीपी वुमनकनेक्ट चॅलेंज लॉन्च करणार आहोत. आमचं लक्ष्य, भारतातील लिंगभेद आणि डिजिटल विभाजन दोन्ही गोष्टींना संपवणे आहे. कारण जेव्हा महिला जागृत होतात तेव्हा कुटुंब जागृत होतं, आणि समाज आणि देशाच्या प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. खऱं पाहता विकसित जग त्यालाच म्हणू शकतो जेथे समान व्यवहार असेल.”

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2019 मध्ये जगभरातील महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी ‘वूमेंस ग्लोबल डेवलेपमेंट प्रोस्पेरिटी’ म्हणजेच W-GDP इनिशिएटिव लॉन्च केलं होतं. याच्या निर्मितीसाठी इवांका ट्रम्प यांची महत्वपूर्ण भूमिका होती. W-GDP इनिशिएटिवचं लक्ष्य 2025 पर्यंत विकासशील देशांतील 50 लाख महिलांपर्यंत पोहोचविणे आहे.

Updated : 13 Aug 2020 2:07 AM GMT
Next Story
Share it
Top