Home > बिझनेस > श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी ९ व्या तर अदानी थेट २४ व्या क्रमांकावर..

श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी ९ व्या तर अदानी थेट २४ व्या क्रमांकावर..

श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी ९ व्या तर अदानी थेट २४ व्या क्रमांकावर..
X

फोर्ब्सने मंगळवारी 4 एप्रिल रोजी जगातील अब्जाधीशांची 37 वी वार्षिक यादी जाहीर केली. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सलग दुसऱ्या वर्षी टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. 2023 मध्ये 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते 9व्या स्थानावर होते, तर 2022 मध्ये 90.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ते 10व्या स्थानावर होता.

मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षीच्या यादीत मुकेश अंबानी मायक्रोसॉफ्टचे स्टीव्ह बाल्मर, गुगलचे लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग आणि डेल टेक्नॉलॉजीजचे मायकेल डेल यांच्यापेक्षा वर आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीत बर्नार्ड अर्नॉल्ट पहिल्या क्रमांकावर, एलोन मस्क दुसऱ्या आणि जेफ बेझोस तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

या यादीत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी २४व्या क्रमांकावर आहेत. 24 जानेवारी रोजी अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. तेव्हा त्याची एकूण संपत्ती सुमारे $126 अब्ज होती. यूएस शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने जारी केलेल्या अहवालानंतर त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. त्यांची एकूण संपत्ती आता ४७.२ अब्ज डॉलर्स आहे आणि अंबानींनंतर ते दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत.

Updated : 5 April 2023 12:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top