Home > बिझनेस > Twitter ब्लू-टिक वाले पुन्हा संकटात?

Twitter ब्लू-टिक वाले पुन्हा संकटात?

Twitter ब्लू-टिक वाले पुन्हा संकटात?
X

मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर गोल्डन टिक (twitter check mark) साठी कंपन्यांना दरमहा एक हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 82 हजार रुपये द्यावे लागतील. इतकंच नाही तर आता कंपन्यांना त्यांच्या ट्विटर अकाउंटशी लिंक केलेल्या इतर खात्यांसाठी दरमहा $50 म्हणजेच सुमारे 4 हजार रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. आता ८२ हजार ४ हजार हे आकडे ऐकून तुम्ही हा ब्लू-टीकचा नादच नको असं म्हणत असणारे बरोबर ना.. ठीक आहे नका करू नाद पण नक्की ही भानगड आहे तरी काय हे तर समजून घ्या.. आता ते समजून घेण्यासाठी पुढची २ मिनिटे हा व्हिडिओ शांतपणे पहा..

ट्विटर नक्की काय करतंय?

ट्विटरने एक प्रोग्रॅम जाहीर केला आहे. यामध्ये ट्विटरने असे म्हटले आहे की, 1 एप्रिलपासून आपला ते लिगेसी वेरिफिकेशन प्रोग्राम 'टप्प्याटप्प्याने' सुरू करेल. या अंतर्गत, कंपनी वापरकर्त्यांच्या अकाउंट वरून ब्लू टिक्स काढण्यास सुरुवात करेल. त्याचा परिणाम थेट वापरकर्त्याच्या खिशावर होणार आहे. आता हे सर्व यासाठीच तर सुरु आहे. फ्री ब्लू टिक वापरणाऱ्यांनी पैसे भरून ट्विटर ब्लूची सेवा घेतली तरी त्यांची ब्लू टिक कायम राहील, पण लीगली व्हेरिफाईडचा टॅग काढून टाकला जाईल.

नवीन व्हेरिफिकेशन प्रोग्राम..

ट्विटरने एक नवीन व्हेरिफाईड ऑर्गनायझेशन प्रोग्राम सुरू केला आहे, ज्या अंतर्गत आता सर्व ट्विटर अकाउंट्स व्हेरिफाय केले जातील. ट्विटरचे लाखो सदस्य असल्याने, गोल्डन टिक मिळविण्यासाठी कंपन्या प्रतीक्षा यादीत सामील होऊ शकतात. ट्विटर बिझनेसने जानेवारीमध्ये कंपन्यांसाठी पडताळणी कार्यक्रम जाहीर केला.

ट्विटर बिझनेसच्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, "आम्ही लवकरच कंपन्यांसाठी व्हेरिफिकेशन सुरू करणार आहोत, ज्यांना पूर्वी ब्ल्यू फॉर बिझनेस म्हणून ओळखले जात होते. एक ग्राहक म्हणून तुम्ही आणि तुमचा व्यवसाय आमच्या सेल्फ-सर्व्ह प्रशासकीय पोर्टलवर नोंदणी करू शकाल." पोर्टलवरून व्यवसाय खाते आणि संलग्न बॅज मिळवण्यास सक्षम असेल.

नवीन व्हेरिफिकेशन प्रोग्राम काय आहे?

ट्विटरने जानेवारीमध्ये अद्ययावत खाते पडताळणी कार्यक्रम सुरू केला. मग सर्व व्हेरीफाईड खाती तीन रंग श्रेणींमध्ये विभागली गेली. या श्रेणींमध्ये कंपन्यांना गोल्डन , राखाडी आणि सामान्य नागरिकांना ब्लू टिक्सचा समावेश आहे. ट्विटर ब्लू 9 नोव्हेंबर रोजी चेक-मार्क बॅजसह लॉन्च करण्यात आले होते, परंतु बनावट खात्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे 2 दिवसांनंतर ही सेवा थांबवण्यात आली. नवीन ब्लू साइन अप बंद करण्यात आले.

ब्लू टिक सेवेसाठी, तुम्हाला दरमहा $8 द्यावे लागतील. Apple च्या App Store वर खरेदी केल्यावर त्याची किंमत प्रति महिना $11 आहे. ऍपल स्टोअरमध्ये ते महाग असण्याचे कारण म्हणजे ऍपलकडून आकारला जाणारा 30% कर. यापूर्वी इलॉन मस्क यांनी अॅपलच्या या कराबद्दल सांगितले होते.

ट्विटरच्या ब्लू सबस्क्रिप्शनची किंमत भारतात महिन्याला ६५० रुपये आहे

खरंतर मस्कला २०२३ च्या अखेरीस Twitter आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे आहे. महसूल वाढवण्यासाठी त्यांनी ब्लू सबस्क्रिप्शनसारख्या काही सेवांमध्येही बदल केले. भारतातील वेब वापरकर्त्यांसाठी या सेवेची मासिक सदस्यता 650 रुपये आहे. त्याचबरोबर अमेरिकेत यासाठी दरमहा 11 डॉलर भरावे लागतील.

Twitter ब्लू सबस्क्रिप्शनमध्ये काय आहे?

$8 च्या या सबस्क्रिप्शनमध्ये, वापरकर्त्यांना ट्विट्स एडिट करण्याची, व्हिडिओ अपलोड करण्याची क्षमता 1080p मध्ये म्हणजेच HD गुणवत्ता, रीडर मोड आणि निळा चेकमार्क मिळतो. सामान्य वापरकर्त्यांपेक्षा 50% कमी जाहिराती पाहिल्या जातात आणि नवीन वैशिष्ट्यांमध्ये देखील प्राधान्य दिले जाते. सदस्य त्यांचे हँडल, डिस्प्ले नाव किंवा प्रोफाइल फोटो देखील बदलू शकतात, परंतु त्यांनी तसे केल्यास, त्यांच्या खात्याचे पुन्हा पुनरावलोकन होईपर्यंत निळा चेकमार्क तात्पुरता काढून टाकला जाईल.

ट्विटर हे का करतंय?

1. कंपनीला दररोज 32 कोटींचा तोटा होत आहे. त्यांना नवीन मॉडेलसह महसूल वाढवायचा आहे.

2. मस्कने ट्विटर $44 बिलियनला विकत घेतले. त्यांना लवकरच त्याची भरपाई करायची आहे.

3. ट्विटरवर प्रचंड कर्ज आहे. ते संपवण्यासाठी जाहिरातदारांवर अवलंबून राहू इच्छित नाही.

Updated : 26 March 2023 4:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top