Home > बिझनेस > अमेरिकेतील 100 प्रभावशाली महिलांमध्ये भारतीय वंशाच्या पाच महिला..

अमेरिकेतील 100 प्रभावशाली महिलांमध्ये भारतीय वंशाच्या पाच महिला..

अमेरिकेतील 100 प्रभावशाली महिलांमध्ये भारतीय वंशाच्या पाच महिला..
X

'ती' काहीही करू शकते याचा प्रत्यय आता आपल्याला वारंवार येत आहे. आपल्या समाजानं 'ति'ला चूल आणि मूल एवढ्या पुरताच मर्यादित ठेवलं होतं पण 'ति'नं ही सर्व बंधनं जुगारून आज 'ती' आपलं कर्तुत्व सिद्ध करत आहे. आपल्या सर्वांचीच मान अभिमानाने वर येईल अशी काही गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर आर्थिक क्षेत्रातील अमेरिकेतील शंभर प्रभावशाली महिलांमध्ये भारतीय वंशाच्या पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश झाला आहे. या महिलांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर आपलं कर्तुत्व सिद्ध केला आहे. जगभरात आपल्या देशाचं नाव अभिमानाने उंचावणाऱ्या या पाच महिला कोण आहेत? हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे माहिती शेवटपर्यंत वाचा..

आर्थिक क्षेत्रातील अमेरिकेतील 100 प्रभावशाली महिलांमध्ये भारतीय वंशाच्या पाच महिला अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या बॅरन मॅगझिनने ही यादी जाहीर केली आहे. जेपी मॉर्गनच्या अनु अय्यंगार, एरियल इन्व्हेस्टमेंट्सच्या रुपल जे भन्साळी, फ्रँकलिन टेम्पलटनच्या सेनाली देसाई, गोल्डमन सॅक्सच्या मीना फ्लिन आणि बँक ऑफ अमेरिकाच्या सविता सुब्रमण्यम यांना या यादीत स्थान मिळाले आहे.

बॅरन्स मॅगझिन अशा महिलांची यादी करते ज्यांनी वित्तीय सेवा उद्योगात महत्त्वाची पदे प्राप्त केली आहेत आणि एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या चौथ्या वार्षिक यादीमध्ये वित्तीय सेवा, कॉर्पोरेट, एनजीओ आणि सरकारी क्षेत्रातील मोठ्या पदावर असलेल्या महिलांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. या १०० महिलांच्या यादीत ५ भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश आहे..

अनु अय्यंगारअनु अय्यंगार जानेवारीमध्ये JP मॉर्गन येथे मर्जर एंड एक्वाजिशन (M&A) च्या जागतिक प्रमुख आहेत. यापूर्वी २०२० पासून त्या या विभागाच्या सह-प्रमुख होत्या.

रुपाली जे भन्साळी

रुपाली जे भन्साळी या वित्त क्षेत्रातील 100 महिलांच्या संचालक मंडळाच्या सदस्य आहेत. महिलांना आर्थिक क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा त्यांचा मानस आहे..

सेनाली देसाई

सेनाली देसाई यांनी 2018 मध्ये फ्रँकलिन टेम्पलटनच्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या पहिल्या महिला बनून इतिहास रचला. त्यांनी 2009 मध्ये फर्म जॉईन केली होती. मिना फ्लिन या गेल्डमॅन सॅचमध्ये ग्लोबल प्रायव्हेट वेल्थ मॅनेजमेंटच्या त्या सह-प्रमुख आहेत.

सविता सुब्रमण्यन

सविता सुब्रमण्यन बँक ऑफ अमेरिका येथे इक्विटी आणि क्वांटिटेटिव्ह स्ट्रॅटेजीच्या प्रमुख आहेत. त्या S&P 500 आणि इतर प्रमुख यूएस मार्केटसाठी अंदाजांवर काम करते.

मग आहे ना आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट.. तर या ५ महिला भारतातील अनेक महिलांना प्रेरणा देणाऱ्या ठरत आहेत.. आजही महिलांना बंधन लादणाऱ्या समाजाला या महिला चोख उत्तर देतील इतकं मात्र नक्की..

Updated : 7 April 2023 2:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top