Home > बिझनेस > आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी या ५ गोष्टी करा..

आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी या ५ गोष्टी करा..

आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी या ५ गोष्टी करा..
X

आता आर्थिक वर्ष 2022-23 संपायला फक्त 3 दिवस उरले आहेत. या 3 दिवसांमध्ये, तुम्हाला PAN आधारशी लिंक करणे आणि सुकन्या खात्यात किमान रक्कम जमा करणे यासारखी आणखी ५ महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत. हे काम न केल्यास तुम्हला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आम्ही तुम्हाला या ५ टास्कबद्दल सांगत आहोत..

1. आधार-पॅन लिंक

तुम्ही अजून तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल, तर ते लवकर पूर्ण करा. तुम्ही हे 31 मार्च 2023 पर्यंत जर केलेनाही तर तुमचे पण बंद होईल.. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) 30 जून 2022 पासून पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1 हजार रुपये विलंब शुल्क आकारत आहे.

2. कर बचत गुंतवणूक..

2022-23 या आर्थिक वर्षासाठी तुम्ही अद्याप कर गुंतवणूक केली नसेल, तर ती लवकरच करा. तुम्ही PPF, सुकन्या समृद्धी योजना, 5 वर्षांची FD आणि ELSS इत्यादींमध्ये गुंतवणूक करून कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवू शकता. यासाठी तुम्हाला ३१ मार्चपर्यंत अशा योजनेत गुंतवणूक करावी लागेल.

3. पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक

जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ते 31 मार्च 2023 पर्यंतच करू शकतात. ही योजना पुढे नेण्यासाठी सरकारने कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही मार्चपर्यंतच यात गुंतवणूक करू शकता. ही 60 वर्षे आणि त्यावरील नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे.

4. म्युच्युअल फंडात नामांकन

जर तुम्ही म्युच्युअल फंडात नॉमिनेशनची प्रक्रिया अजून पूर्ण केली नसेल, तर हे काम लवकरात लवकर करा. यासाठी सर्व फंड हाऊसेसने ३१ मार्चची मुदत दिली आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचे म्युच्युअल फंड खाते गोठवले जाऊ शकते.

5. PPF आणि सुकन्या खात्यात किमान रक्कम जमा करा

तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्येही गुंतवणूक करत असाल तर या खात्यात ३१ मार्चपर्यंत किमान रक्कम जमा करा. तुम्ही ३१ मार्चपर्यंत किमान ५०० रुपये जमा न केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. याशिवाय सुकन्या खात्यात किमान रक्कम (रु. 250) जमा करावी लागेल. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी किमान रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.

मग तुम्ही जर या गोष्टी केल्या नसतील तर लवकरात लवकर करा.. जेणेकरून परत टेन्शन घेण्याची वेळ येणार नाही.. बाकी हा व्हिडिओ कसा वाटलं हे कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा..

Updated : 28 March 2023 12:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top