Home > बिझनेस > ‘घे ऐकून वेड्या मातीमध्ये जाशील...’

‘घे ऐकून वेड्या मातीमध्ये जाशील...’

‘घे ऐकून वेड्या मातीमध्ये जाशील...’
X

“आम्ही सरकारचा संदेश लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहचवत असतो. पण मागील दोन वर्षात आमची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. आमचे मंत्री आहेत प्रकाश जावडेवर त्यांना दिल्लीत जाऊन भेटलो. पण त्यांनी अजून काही केलयं नाही आमच्यासाठी. तेव्हा सरकारने आम्हाला उपासमारिने मारण्यापेक्षा इच्छा मरणाची परवानगी द्यावी.” ही व्यथा आहे पुण्यातील लोककलावंतांची.

जागरण-गोंधळ, लावणी, शाहिरी, नकला, गायन यांसारख्या कला जोपासून आपला चरितार्थ चालवणाऱ्या लोककलावंतांवर लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट कोसळलं आहे. फेब्रुवारी ते जुन हा उत्सव, जत्रा, लगनसराईचा काळ या कलावंतांसाठी मुख्य असतो. वर्षभराची त्यांची बऱ्यापैकी कमाई याच महिन्यांमध्ये होते.

या बाबत बोलताना सत्यभामा आवळे म्हणाल्या की, “मगच्या दोन वर्षापासून महाराष्ट्रातले लोककलावंत उपासमारिने मरत आहेत. त्यात हा कोरोना आला त्याला आम्ही तोंड देतोय. तेव्हा सरकारने आम्हाला उपासमारिने मारण्यापेक्षा इच्छा मरणाची परवानगी द्यावी. आमच्यावर भीक मागण्याची वेळ येऊ देऊ नका सरकार कारण आम्ही या महाराष्ट्राचे लोककलावंत आहोत. आम्हीच वाघ्या मुरळी आहोत. आम्हीच गोधळी आणि आम्हीच शाहिरी आहोत, पोवाडे आहोत.”

या पुढं बोलताना सत्यभामा आवळे म्हणाल्या की, “आज आमच्या जनजागृतीच्या 84 पार्ट्या आहेत, पाच हजार कलावंत गोंधळी, वाघ्या मुरळीचे आहेत. आम्ही शासनाचं एवढ काम करतोय. नरेंद्र मोदी म्हणतात आम्ही गरिबाला पाच किलो तांदूळ दिले पण जरा सरकारने चौकशी करावी किती गरिबांना ते मिळालेत. रेशनच्या दुकानात गेलं तर हाकलून देतात.” त्यामुळे शासनाने आमच्या परिस्थितीवर काहीतरी तोडगा काढावा अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी लोककलावंतांच्या वतीने सत्यभामा आवळे यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी "घे ऐकुन वेड्या नाही तर माती मध्ये जाशील" हे गाणं म्हणत कोरोना बाबत जनजागृतीही केली.

https://youtu.be/hEVSvNhwZ1Y

Updated : 31 July 2020 3:37 AM GMT
Next Story
Share it
Top