Home > बालक-पालक > कलंक : 500 रुपयांसाठी महिलेला बाळ न देणाऱ्या परिचारीका

कलंक : 500 रुपयांसाठी महिलेला बाळ न देणाऱ्या परिचारीका

कोरोना काळात केलेल्या कामामुळे परिचारीकांना सन्मान मिळाला. पण बुलढाण्यात काही परिचारीकांनी 500 रुपयांसाठी महिलेला बाळ न दिल्याने त्या या सन्मानावरील कलंक ठरल्या आहेत..

कलंक : 500 रुपयांसाठी महिलेला बाळ न देणाऱ्या परिचारीका
X

कोरोना काळात आरोग्य विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत सेवा बजावली. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचा सन्मान करत त्यांचे कौतुक केले जात आहे मात्र दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना घडली आहे.

चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात महिलेची प्रसुती झाल्यानंतर त्या नवजात बालकाला मातेच्या स्वाधीन करण्यासाठी रुग्णालयात सेवर असणाऱ्या परिचारिकांनी केवळ पाचशे रुपयासाठी या मातेची अडवणूक केल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. या महिलांच्या नातेवाईकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायला होताच सर्वच स्तरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य विभागाला मिळलेल्या तक्रारीनुसार तात्काळ चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशी समितीने तात्काळ चौकशी करून अहवाल देखील सादर केला आहे.

पार्वती सुरडकर या महिलेने आपल्या गरोदर मुलीला १९ डिसेंबरच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. दरम्यान रात्री दोनच्या सुमारास प्रसुती वेदना सुरू झाल्याने रूग्णालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसाठी १२०० रूपयांची मागणी केली. मुलीचा त्रास पाहता पार्वतीबाईनी ती मागणी मान्य केली. मात्र, प्रसुतीपश्चात त्यांच्याकडे दोन हजार रूपयांची मागणी करण्यात आली. मोलमजुरीने उदरनिर्वाह करणाऱ्या पार्वतीबाईकडे त्यावेळी दीड हजार रुपयेच होते. त्यात रात्रीची वेळ पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्या महिलेला पडला होता. मात्र, संबंधीत महिला कर्मचाऱ्यांनी उर्वरित पाचशे रूपये द्या तेव्हांच बाळ देईल, अशी अडवणूक केली. याबाबत पार्वतीबाईंनी आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार देखील केली आहे.

पार्वतीबाई यांचा त्या रात्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चिखली मतदार संघाचे आमदार शेता महाले यांनी देखील आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरले असून त्या परिचारिकां वर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत त्यानुसार आरोग्य विभागाने तात्काळ चौकशी समिती नेमून चौकशी समितीने आपला अहवाल दाखल केल्याने या महिलांवर आता निश्चित कारवाई होणार असून कडक कारवाई झाल्यास अशा कामचुकार आणि लालची कर्मचारी वृत्तीला थोडा का होईना आळा बसेल एवढे निश्चित.


Updated : 26 Dec 2020 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top