मॉलमध्ये मुलाचा 'तमाशा' आणि बापाचा पराभव!
तुम्हीही मुलांच्या हट्टापायी 'शांतता' विकत घेताय का?
X
मॉलमध्ये ३००० रुपयांच्या खेळण्यासाठी त्या ४ वर्षांच्या पोराचा तो तमाशा बघून अख्खा मॉल त्यांच्याकडे बघत होता... 🤯
तो हात-पाय आपटत होता, किंचाळत होता.
त्याचे बाबा घामाने ओलेचिंब झाले होते. भीती मुलाची नव्हती, भीती होती ती "चार लोक काय म्हणतील?" याची!
त्या ऑकवर्ड (Awkward) शांततेत, त्या बापाने खिशातून कार्ड काढलं आणि ते खेळणं विकत घेऊन मुलाच्या हातात दिलं.
मुलगा एका सेकंदात शांत! पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
तुम्हाला वाटलं असेल, "चला, विषय संपला!"
नाही. इथेच आपण पालक म्हणून प्रेमापोटी फसतो.
त्या दिवशी त्या बापाने ३००० रुपयांचं खेळणं नाही विकत घेतलं, तर नकळत मुलाच्या 'हट्टीपणाला' बळ दिलं.
एक बालरोगतज्ज्ञ म्हणून सांगतो:
तुमचं मूल जन्मतः हट्टी नाहीये. त्याला हट्टी बनवतं ते 'कंडिशनिंग' (Conditioning).
मुलाचं गणित सिम्पल असतं:
"मी एकदा रडलो की आई 'नाही' म्हणते.
दोनदा रडलो की बाबा ओरडतात.
पण... जर मी जोरात किंचाळलो आणि चार लोकांत 'तमाशा' केला, की हे लोक मला गप्प करण्यासाठी ती वस्तू घेऊन देतातच!"
जेव्हा तुम्ही १० मिनिटांच्या रडण्यानंतर "बरं बाबा, घे आणि गप्प हो एकदाचा!" म्हणून ती वस्तू देता, तेव्हा मुलाचा मेंदू हाच धडा गिरवतो:
"नियम तोडले आणि तमाशा केला की जगातली कोणतीही गोष्ट मिळते."
आज हा हट्ट ३००० च्या खेळण्याचा आहे.
उद्या तो १८ वर्षांचा होईल. तेव्हा तो जमिनीवर लोळण नाही घेणार...
तेव्हा तो "मला २ लाखांची बुलेट पाहिजे, नाहीतर मी जेवणार नाही/घरी येणार नाही" असं म्हणून तुम्हाला 'इमोशनल ब्लॅकमेल' करेल.
तेव्हा काय कराल?
कारण त्याला 'नाही' पचवायची सवयच नाहीये.
मग पालकांनी नक्की काय करायचं? (3 Scientific Rules) ✅
१. 'नाही' म्हणजे 'नाही'च! (Be a Wall)
एकदा 'नाही' म्हणालात, की विषय संपला. मग त्याने मॉल डोक्यावर घेऊ दे किंवा उपवास करू दे. जर तुम्ही हट्टापायी निर्णय बदलला, तर तुम्ही हरलात आणि त्याचा हट्ट जिंकला.
२. 'सावध' दुर्लक्ष (Active Ignoring) - हेच खरं औषध!
जेव्हा मूल विनाकारण हट्ट करतं, तेव्हा त्याच्याकडे शांतपणे दुर्लक्ष करा.
लोकांकडे बघू नका. लोक ५ मिनिटं बघतील आणि विसरून जातील. पण जर तुम्ही लोकांच्या भीतीपोटी मान झुकवली, तर मुलाला सवय लागेल.
लक्षात ठेवा, हट्टीपणाला 'प्रेक्षक' (Audience) लागतात. जेव्हा प्रेक्षकच नसतात, तेव्हा तो 'शो' (Show) आपोआप बंद पडतो.
(टीप: जोपर्यंत तो स्वतःला इजा करत नाही, तोपर्यंत काळजी करु नका).
३. शांतता विकत घेऊ नका (No Bribing)
"तू रडला नाहीस तर चॉकलेट देईन..." हे वाक्य म्हणजे लाच आहे.
तात्पुरती शांतता मिळेल, पण भविष्यात घरातली शांतता भंग होईल.
पालकांनो,
त्याच्या डोळ्यातले आजचे अश्रू परवडले, पण भविष्यातल्या उद्ध्वस्त आयुष्याचे अश्रू नकोत.
कणखर व्यक्तिमत्त्व घडवायला पालकांनाही थोडं 'दगडासारखं' घट्ट व्हावं लागतं!
तुमच्या घरात किंवा मॉलमध्ये असा प्रसंग घडलाय का? तेव्हा तुम्ही काय केलं होतं?
प्रामाणिकपणे खाली सांगा. इतरांनाही त्यातून शिकायला मिळेल. 👇
डॉ. सुजित भरत पाटील
बालरोगतज्ज्ञ, पुणे.
(साभार - सदर पोस्ट डॉ. सुजित भरत पाटील यांच्या फेसबुक वॉल वरून घेतली आहे.)






