Home > बचत गट > सर्वोदय गृहउद्योगातील ११५ महिलांच्या इकोफ्रेंडली गणेशमूर्ती

सर्वोदय गृहउद्योगातील ११५ महिलांच्या इकोफ्रेंडली गणेशमूर्ती

सर्वोदय गृहउद्योगातील ११५ महिलांच्या इकोफ्रेंडली गणेशमूर्ती
X

काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या मूर्तिकारांनी आधीच तयारी करून ठेवली होती. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंदा मोठ्या मूर्तिकारांना मूर्ती तयार न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाच्या या सूचनेने मोठ्या मूर्तिकारांची चिंता वाढविली आहे. कोरोनापुढे त्यांनीही हात टेकले आहेत.

त्यातच दरवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांमुळे होणारे प्रदुषण हा चर्चेचा विषय बनलेला असतो. या बाबत दरवर्षी पर्यावरणवादी संघटनांकडून जनजागृती करण्यात येत असते त्याचाच भाग म्हणून अकोल्यातील एका पर्यावरणप्रेमी महिला बचत गटाने इको फ्रेंडली बाप्पा बनवऊन विक्री करण्याचा निर्णय घेतला.

या बचत गटाचं नाव आहे. सर्वोदय गृहउद्योग. या उद्योग समुहाने मास्क आणि पाणी पुरीचा व्यवसाय सुरु करुन पंन्नास हजारांहून अधीक मास्कची विक्री केली. याचा फायदा परिसरातील तब्बल 115 महिलांनासुध्दा झाला.

आता सर्वोदयने आपला मोर्चा गणपती व्यवयाकडे वळवला आहे. या बाबत सांगताना बचत गटाच्या अध्यक्षा दिपीका देशमुख म्हणाल्या की, “आम्ही या मुर्त्या शाडू माती व राखे पासुन बनवतो. गणपती रंगवण्यासाठी वापरले जाणारे रंग सुध्दा आम्ही नैसर्गीक रंग वापरतो. जेणेकरुन त्याचा पर्यावरणाला कोणताही त्रास होणार नाही. आजुबाजूच्या परिसरात आमच्या मुर्त्यांना मागणी वाढतेय. आज साधारण 115 महिला या उद्योग समुहात जोडल्या गेल्या आहेत.”

आज सर्वोदय महिला बचत गट मसाले, पापड, कुरडया, मास्क, रेडीमेड पाणी पूरी, इंस्टंच इडली पीठ, इंस्टंट ढोकळा पीठ ही उत्पादनं बाजारात ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.

https://youtu.be/i0DnnUCM4L4

Updated : 13 Aug 2020 10:12 PM GMT
Next Story
Share it
Top