Home > Auto > हिरो इलेक्ट्रिकची 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होणारी स्कूटर, काशी असेल ही स्कुटर पहा...

हिरो इलेक्ट्रिकची 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होणारी स्कूटर, काशी असेल ही स्कुटर पहा...

हिरो इलेक्ट्रिकची 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होणारी स्कूटर, काशी असेल ही स्कुटर पहा...
X

हिरो इलेक्ट्रिक आता आपली इलेक्ट्रिक वाहने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वावर करत तयार करत आहे. यामध्ये ते (EVs) १५ मिनिटांत बॅटरी चार्ज होईल अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे. यासाठी हिरोने बेंगळुरूयेथील लॉग 9 कंपनीसोबत भागीदारी केली आहे. Hero Log 9 चे इंस्टा चार्जिंग RapidX बॅटरी पॅक वापरेले असून. कंपनीचा दावा आहे की लॉग 9 च्या बॅटरीच्या मदतीने हीरो इलेक्ट्रिक स्कूटर 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल.

लॉग 9 ची बॅटरी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकेल

लॉग 9 इंस्टा चार्जिंग बॅटरी पॅक जलद चार्जिंग, क्विक बॅटरी लाइफ आणि 10 वर्षांपेक्षा जास्त आयुष्य देते. RapidX बॅटरी -30° ते 60°C या तापमानात वापरल्या जाऊ शकतात. या बॅटरीज सुरक्षितता वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत जस की त्याला त्या बॅटरीला आग वैगेरे लागणार नाहीत आणि कमी अधिक तापमानात सुद्धा ती सुरक्षित राहतील अशी ही बॅटरी आहे.

Hero Electric च्या पोर्टफोलिओमधील सर्व-इलेक्ट्रिक दुचाकी सहज तयार करता येऊ अशकतात, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या कार्यालयात किंवा अपार्टमेंटमध्ये त्यांच्या पोर्टेबल बॅटरी चार्ज करता येतात. हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल या इलेक्ट्रिक बाईक विषयी बोलताना म्हणाले की, "आम्ही आता लॉग 9 बॅटरी असलेल्या बाईक सादर करणार आहोत, ती इतक्या वेगाने चार्जिंग होते की, जितका वेळ एखाद्या ड्रायव्हरला चहा पिण्यासाठी लागतो तितक्या वेळात या बाईकची बॅटरी चार्ज होईल.

परंतु जलद चार्जिंगमुळे बॅटरी खराब होत असल्याचं सुद्धा समोर आलं आहे. नवीन संशोधनानुसार, EV मधील फास्ट चार्जिंग सिस्टीम त्याची बॅटरी खराब करत असून. त्यामुळे वाहन चार्ज करण्यासाठी अधिक वेळ देणे गरजेचं होणार आहे. EV ची बॅटरी काही मिनिटांत चार्जिंगचे तंत्रज्ञान स्वीकारल्यास ती लवकर चार्ज होईल, परंतु ती लवकर खराब होण्याची शक्यता असते. हा अभ्यास 'द इलेक्ट्रोकेमिकल सोसायटी जर्नल'मध्ये प्रकाशित झाला आहे.

Updated : 16 Dec 2021 11:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top