Home > Auto > ई-कार घेणार असाल तर खुश खबर...

ई-कार घेणार असाल तर खुश खबर...

ई-कार घेणार असाल तर खुश खबर...
X

टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय Suv Nexon EV च्या किमती कमी केली आहे. बेस ट्रिमच्या किमतीत 50 हजार रुपयांची कपात झाली आहे. या गाडीची किंमत 14.99 लाख (सर्व किंमती एक्स-शोरूम) वरून 14.49 लाख इतकी करण्यात आली आहे. त्याच वेळी, Nexon EV Max मध्ये एक नवीन प्रकार XM देखील जोडला गेला आहे. त्याची किंमत 16.49 लाख रुपये आहे. Nexon EV लाँचला 3 वर्षे पूर्ण झाल्यामुळे किमती कमी करण्यात आल्या आहेत.

महिंद्राने नवीन पूर्णपणे इलेक्ट्रिक XUV400 ची किंमत जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर कंपनीचा हा निर्णय आला आहे. बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, जी 18.99 लाख रुपयांपर्यंत जाते. या किमती आहेत ज्या पहिल्या 5000 ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. ही महिंद्रा एसयूव्ही टाटा नेक्सॉन ईव्हीशी बाजारात स्पर्धा करत आहे. त्याच सोबत हि गाडी सिंगल चार्जमध्ये 456 किमी धावेल.

Nexon EV दोन प्रकारात येते

Nexon EV दोन प्रकारांमध्ये (प्राइम आणि मॅक्स) या प्रकारात येते आणि वेगवेगळ्या चार्जिंग पर्याया देखील यामध्ये उप्लब आहेत. नवीन किंमत अपडेटसह, EV प्राइम (बेस मॉडेल) ची प्रारंभिक किंमत 14.49 लाख रुपये झाली आहे आणि टॉप मॉडेलची किंमत Nexon EV Max ची किंमत 16.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. संपूर्ण Nexon EV लाईन-अप साठी बुकिंग लगेच सुरु झाले आहे. Nexon EV MAX XM या नवीन प्रकाराची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होईल.

Updated : 17 March 2023 7:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top