Home > Auto > "चांगल्या भाग्याचा " भगतसिंग ... आज आहे जन्मदिवस

"चांगल्या भाग्याचा " भगतसिंग ... आज आहे जन्मदिवस

चांगल्या भाग्याचा  भगतसिंग ... आज आहे जन्मदिवस
X


वयाच्या २३ व्या वर्षी देशासाठी बलिदान देणारे भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक सेनानी शहीद भगतसिंग हे भारताचे महान व्यक्तिमत्व आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक तरुण क्रांतीकारकांनी स्वतःचे प्राण गमावले . पण भगतसिंग हे त्या काळात सर्व तरूणांचे युवा प्रतीक होते,ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुण पिढीला प्रेरित केले.

महान क्रांतिकारक यांचा जन्म पंजाबच्या जरवाला तहसीलमधील बंगा या लहान गावात २७ सप्टेंबर १९०७ रोजी झाला. ते शीख कुटुंबातील होते.त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशन सिंह आणि आईचे नाव विद्यावती कौर होते.जेव्हा भगतसिंगचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील किशनसिंगजी तुरूंगात होते. भगतसिंगही लहानपणापासूनच आक्रमक होते.

५ वर्षांचे असल्यापासून ते मित्रांसोबत युद्धासारखे चित्र तयार करून खेळ खेळायचे . त्याच वेळी भगतसिंगांच्या प्रत्येक कार्यात त्यांचे शौर्य, संयम आणि निर्भयता यांचे पुरावे मिळतात. भगतसिंग लहानपणापासूनच देशभक्त होते .लहानपणापासूनच त्यांनी भारतीयांवर होणारे ब्रिटिश अत्याचार पाहिले होते आणि त्यामुळेच त्यांनी अगदी लहान वयातच देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यानुसार भगतसिंग यांनी क्रांती घडवली .

त्यांनी अनेक तरुणांच्या मनात स्वतंत्र्याची मशाल पेटवली . भारताची गुलामीतून सुटका करणे हाच त्यांचा उद्देश होता .

स्वातंत्रलढ्यात संपूर्ण कुटुंब सहभागी

भगतसिंग यांच्या काकांचे नाव सरदार अजितसिंह होते, हे एक सुप्रसिद्ध क्रांतिकारक होते ज्यांना ब्रिटीश पण घाबरत होते.भगतसिंगच्या जन्मानंतर त्याच्या आजीने त्याचे नाव 'भागो वाला' ठेवले. ज्याचा अर्थ 'चांगल्या भाग्याचा' आहे. जेव्हा भगतसिंगचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील किशनसिंगजी तुरूंगात होते. ज्या दिवशी ते जन्माला आले त्याच दिवशी त्यांचे वडील तुरुंगातून बाहेर आले म्हणूनच त्यांचे नाव "भागो वाला "म्हणजेच चांगल्या भाग्याचा असं ठेवले होते . नंतर ते 'भगतसिंग' म्हणून ओळखले जाऊ लागले.

करतार सिंग सरभा आणि लाला लाजपत राय यांचा महान स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्यावर मोठा प्रभाव होता. १९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाचा भगतसिंग यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.या हत्याकांडात अनेक निर्दोष भारतीय मारले गेले आणि बर्‍याच लोकांनी आपले कुटुंब गमावले, ते पाहून भगतसिंगाच्या मनात ब्रिटीश राज्यकर्त्यांविरूद्ध प्रचंड रोष निर्माण झाला होता आणि तेव्हापासून भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र करायचा विचार करू लागले.

लग्नाला दिला नकार ..

जेव्हा घरचे त्यांचे लग्न ठरवत होते तेंव्हा देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली.भगतसिंगांनी 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले.लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणार्‍या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले.सगळे फरारी झाले . 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंबलीत बाँब फेकला. एकच गोंधळ तयार झाला.पण त्यांनी स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले. फाशी देण्यात आलेला तो दिवस 'शहिद दिन' म्हणूनही ओळखला जातो.

आजही अनेक तरुण भगतसिंगांच्या क्रांतीचा बोध घेतात.

Updated : 28 Sep 2022 6:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top