Home > Auto > Poise च्या दोन नव्या इलेक्ट्रीक स्कुटर्स लाँच, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Poise च्या दोन नव्या इलेक्ट्रीक स्कुटर्स लाँच, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Poise ने NX120 आणि Grace या दोन नव्या इलेक्ट्रीक स्कूटर्स लाँच करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये...

Poise च्या दोन नव्या इलेक्ट्रीक स्कुटर्स लाँच, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
X

देशात वाढणाऱ्या इंधनाच्या दरवाढीमुळे ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रीक स्कूटर्सकडे जास्त वाढला आहे. महागाईच्या काळात सरकारकडून सुध्दा सातत्याने इलेक्ट्रीक स्कूटर्सला प्राधान्य दिलं जातंय. उत्पादन कंपन्या देखील मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रीक स्कूटर्सची निर्मिती करत आहेत. त्यात आता Poise NX120 आणि Poise Grace या दोन नव्या स्कूटर्स लाँच झाल्या आहेत. जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत...

कंपनीने Poise NX 120 1,24,000 या सुरुवातीच्या किंमतीसह आणि Poise Grace 1,04,000 या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लाँच केल्या आहेत. पण केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना दिले जाणारे फेम, वेगवेगळ्या राज्यांनी दिलेल्या सबसिडी यामुळे या इलेक्ट्रिक स्कूटर्सची किंमत खूपच कमी होऊ शकते.

स्कूटरच्या बॅटरी आणि पॉवरबद्दल बोलायचं झाल्यास कंपनीने ८०० वॅट्सपासून ते २.२ आणि ४ kW पर्यंतची पॉवर असलेली बॉश मोटर दिली आहे, त्यात वापरलेल्या लिथियम-आयन बॅटरी पॅक देखील आहे. कंपनी या स्कूटरच्या बॅटरीवर ३ वर्षांची वॉरंटी देत आहे आणि ही वॉरंटी मोटर आणि स्कूटरच्या इतर भागांवरही देतेय हे विशेष!

या बॅटरीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने ती काढता येण्याजोगी बनवली आहे, त्यानुसार तुम्ही ही बॅटरी स्कूटरमधून काढून तुमच्या घर, ऑफिस किंवा इतर ठिकाणी सामान्य चार्जरच्या मदतीने सहज चार्ज करू शकता. स्कूटरच्या रेंजबद्दल, कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, या स्कूटर ताशी ५५ किमीच्या टॉप स्पीडसह ११० किमीची रेंज देतात. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे काँबिनेशन दिले आहे.

Updated : 13 March 2022 10:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top