Home > Auto > OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेण्यासाठी खिसा जास्त हलका करावा लागणार..

OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेण्यासाठी खिसा जास्त हलका करावा लागणार..

OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेण्यासाठी खिसा जास्त हलका करावा लागणार..
X

OTT प्लॅटफॉर्म Amazon ने प्राइम मेंबरशिप सबस्क्रिप्शन योजना ६७% पर्यंत महाग केल्या आहेत. आता 1 महिन्याची प्राइम मेंबरशिप 120 रुपयांनी आणि 3 महिन्यांची मेंबरशिप 140 रुपयांनी महागली आहे.

आता एका महिन्याच्या सदस्यत्वासाठी 299 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 179 रुपये मोजावे लागत होते. त्याच वेळी, 3 महिन्यांच्या प्राइम मेंबरशिपसाठी 599 रुपये भरावे लागतील. यापूर्वी यासाठी ४५९ रुपये मोजावे लागत होते.

1 वर्षाच्या योजनेच्या किमतींमध्ये कोणताही बदल नाही...

Amazon ने वार्षिक प्राइम मेंबरशिप आणि लाइट मेंबरशिप प्लॅनच्या किमती बदललेल्या नाहीत. यासाठी वापरकर्त्यांना पूर्वीप्रमाणेच 1 हजार 499 रुपये आणि 999 रुपये द्यावे लागतील.

अॅमेझॉन प्राइम मेंबरशिपमध्ये युजरला काय मिळते?

प्राइम मेंबरशिप अंतर्गत, अॅमेझॉन आपल्या वापरकर्त्यांना अनेक प्रकारच्या सेवा प्रदान करते. यामध्ये Amazon शॉपिंग अॅपपासून संगीत आणि OTT सेवांपर्यंत सर्वकाही समाविष्ट आहे. प्राइम मेंबरशिपमध्ये तुम्हाला प्राईम व्हिडिओवर अमर्यादित OTT कंटेंट, चित्रपट आणि शो बघायला मिळतात. वापरकर्ते कोणत्याही जाहिरातीशिवाय प्राइम म्युझिक अॅपवर 100 दशलक्ष गाण्यांचा आनंद घेऊ शकतात.

याशिवाय, तुम्हाला Amazon Shopping App वर तुमच्या ऑर्डरची अगदी जलद गतीने मिळण्याची सुविधा देखील मिळते. भारतात 4 दशलक्षाहून अधिक उत्पादनांवर त्याच दिवशी/1-दिवसाची मोफत डिलिव्हरी देखील दिली जाते. तुम्हाला शॉपिंग अॅपवर खास डील आणि विशेष इव्हेंटमध्ये लवकर प्रवेश मिळतो. म्हणजेच, तुम्ही 24 तास अगोदर विक्री आणि हॉट डीलचा लाभ घेऊ शकता. याशिवाय प्राइम मेंबरशिपमध्ये तुम्हाला ई-बुक्स, मॅगझिन, कॉमिक्स आणि गेम्सचाही प्रवेश मिळतो.

Updated : 28 April 2023 1:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top