Home > Auto > OnePlus मोबाईलवर धमाकेदार ऑफर...

OnePlus मोबाईलवर धमाकेदार ऑफर...

OnePlus मोबाईलवर धमाकेदार ऑफर...
X

चीनी टेक कंपनी OnePlus ने या महिन्यात 4 एप्रिल रोजी एक नवीन मिड-रेंज स्मार्टफोन 'OnePlus Nord CE 3 Lite 5G' भारतात लॉन्च केला आहे. खरेदीदार हा स्मार्टफोन 11 एप्रिलपासून OnePlus च्या अधिकृत वेबसाइट oneplus.in आणि ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून खरेदी करू शकतील.

कंपनीने याआधी ICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांना ऑफर म्हणून 1 हजार रुपयांची झटपट सूट जाहीर केली होती. आता कंपनीने जाहीर केले आहे की, सेलच्या पहिल्या दिवशी म्हणजे 11 एप्रिलला हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 'OnePlus Buds CE' मोफत मिळेल. स्मार्टफोनसोबत मोफत उपलब्ध असलेले हे इअरबड्स सध्या वनप्लस वेबसाइटवर 2 हजार 299 रुपयांना उपलब्ध आहेत.

9 रुपयात वॉरंटी एक्स्टेंशन..

OnePlus च्या अधिकृत वेबसाइटवरून OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन खरेदी करताना, तुम्ही अतिरिक्त 99 रुपये भरून 1 वर्षासाठी वॉरंटी वाढवू शकता. म्हणजेच 99 रुपये भरून तुम्हाला स्मार्टफोनवर एकूण 2 वर्षांची वॉरंटी मिळेल. याव्यतिरिक्त, तुम्हाला 1 हजार 999 रुपयांमध्ये 12 महिन्यांचा स्क्रीन प्रोटेक्टर प्लॅन आणि 2 हजार 499 रुपयांमध्ये अपघाती नुकसान संरक्षण योजना मिळू शकते. या दोन्ही प्लॅनची ​​वैधता १२ महिन्यांची आहे. याशिवाय, तुम्ही 5 हजार 499 रुपयांमध्ये 'वनप्लस प्लॅन' घेऊ शकता, ज्यामध्ये कंपनी 24 महिन्यांसाठी सर्व प्रकारचे नुकसान भरून काढेल.

Updated : 10 April 2023 5:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top