Home > Auto > kia ची इलेक्ट्रिक कार भारतात होणार लॅन्च, 18 मिनिटांत 80% चार्ज होणार..

kia ची इलेक्ट्रिक कार भारतात होणार लॅन्च, 18 मिनिटांत 80% चार्ज होणार..

kia ची इलेक्ट्रिक कार भारतात होणार लॅन्च, 18 मिनिटांत 80% चार्ज होणार..
X

Kia 2 जून 2022 रोजी भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. kia लॅन्च करत असलेल्या कारचे नाव EV6 इलेक्ट्रिक क्रॉसओवर आहे. या कारचे बुकिंग सुरू झाले आहे. ही कार 12 शहरांमधील 15 निवडक डीलरशिपवर 3 लाख रुपयांच्या टोकन रकमेवर बुक केली जाऊ शकते. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील बुक केली जाऊ शकते. कंपनीने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर कारचे बुकिंग सुरू केले आहे.

भारतात फक्त 100 युनिट्स विकल्या जातील

नवीन Kia EV6 चे फक्त 100 युनिट्स भारतात विकले जानार आहेत. त्यामूळे बुकिंग सुरू होताच, काही मिनिटांत कार पूर्णपणे विकली जाईल, असा अंदाज आहे. EV6 व्यतिरिक्त, कंपनीने EV6 Lite, EV6 Air, EV6 Water आणि EV6 Earth या नावांच्या ट्रेडमार्कसाठी देखील अर्ज केला आहे. ही सर्व EV6 इलेक्ट्रिक कारच्या विविध प्रकारांची नावे असू शकतात. गेल्या वर्षी मे मध्ये सादर करण्यात आलेली, Kia EV6 Hyundai च्या Ionic 5 वर आधारित आहे आणि e-GMP प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे.

Kianew

EV 77.4 kW-R बॅटरी पॅक आहे. त्याचसोबत 605Nm पीक टॉर्कसह 321Bhp जनरेट करते, तर कमी शक्तिशाली 58kW-R बॅटरी पॅकमध्ये Kia EV6 देखील मिळतो जो 170Bhp पॉवर आणि निर्मिती करतो. 350Nm पीक टॉर्क बनवते. या गाडीतील सर्वत महत्वाची गोष्ट म्हणजे कारची बॅटरी फक्त 18 मिनिटांत 10-80% पर्यंत चार्ज होते. आणि या बॅटरीची रेंज 528 KM पर्यंत आहे आणि कमी पॉवरफुल बॅटरी सिंगल चार्जमध्ये 400 KM पर्यंत मायलेज देते.

Updated : 31 May 2022 4:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top