Home > Auto > इथं पुरुष लग्न करून सासरी जातात ...

इथं पुरुष लग्न करून सासरी जातात ...

इथं पुरुष लग्न करून सासरी जातात ...
X

ईशान्य भारतातील दुर्गम भागातील एका गावात महिलांना अत्यंत आदराने पाहिले जाते. सुमारे 10 लाख लोकांचा वंश महिलांच्या आधारावर चालतो.

मेघालयातील एक विशिष्ट गोष्ट म्हणजे मेघालयातील खासी समाजातील महिला ह्या घरचा कारभार सांभाळतात तेथे स्त्री प्रदान संस्कृती आहे. तसेच तिथे महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहेत आणि विशेषतः तेथील घरातल्या लहान मुलींना संपत्तीचा वाटा जास्त मिळतो आणि तीच घरातल्या मोठ्यांचा आणि आई वडिलांचा सांभाळ करते. पुरुष लग्नानंतर बायकोच्या घरी जातात म्हणजे घरजावई म्हणून राहतात आणि त्यांच्या अपत्यांना स्त्रीयांच्या आई वडिलांचे नाव दिले जाते.

मेघालयातील खासी जातीच्या समाजात महिला केंद्रस्थानी आहेत. पुरुष हक्क कार्यकर्ते कीथ परियात म्हणतात, "तुम्ही केंद्रात जाऊन कोणत्याही रुग्णालयात बाळाला पाहू शकता. जर का मुलगा झाला तर लोक खेदाणे म्हणायचे, 'ठीके,चालेल.' "जर मुलगी झाली असती तर आनंद पोटात मावला नसता ." शिवाय, जर कुटुंबात मुलगी नसेल, तर त्या कुटुंबाला मुलगी दत्तक घ्यावी लागते, जेणेकरून ती वारस बनू शकेल. नियमानुसार त्याची मालमत्ता मुलाला देता येत नाही. ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे.

"एखाद्या पुरुषाला सासूच्या घरी राहावं लागत असेल तर त्याला गप्प बसावं लागतं. तुमचा वापर फक्त बाळंतपणासाठी होतो. तुमचा आवाज ऐकायला कोणी तयार नाही, तुमचं मत जाणून घ्यायचं नाही. कोणत्याही निर्णयात हस्तक्षेप करू नका. "खासी पुरुषांसाठी ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे, असे शिलाँगमधील ६० वर्षीय व्यापारी यांचे मत आहे, "पुरुषांवर कोणतीही जबाबदारी नसल्यामुळे ते जीवन सहजतेने घेतात. यामुळे ते ड्रग्जकडे वळतात आणि त्यात अडकतात. दारूमुळे आणि त्यांचे जीवन निरर्थक होते.

एकीकडे पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व पाहता या खासी समाजातील महिलांची हि खासियत नक्कीच खास आहे

Updated : 10 Jan 2023 10:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top