Home > Auto > Oppo - Samsunag ला टक्कर देणार..

Oppo - Samsunag ला टक्कर देणार..

Oppo - Samsunag ला टक्कर देणार..
X

स्मार्टफोन ब्रँड Oppo ने 13 मार्चला एक फोने लॉन्च केला आणि त्यानंतर सर्वात्र त्याची एकच चर्चा सुरु झाली.. अगदी त्याची तुलना सॅमसंग सोबत सुद्धा होऊ लागली.. कोणता आहे हा फोन? काय आहे खासियत? चला तर पाहुयात.. या फोनच नाव फोल्डेबल स्मार्टफोन OPPO Find N2 Flip आहे. हँडसेट 3.62-इंच कव्हर डिस्प्लेसह 6.8-इंच AMOLED स्क्रीनला सपोर्ट करतो. Oppo Find N2 Flip भारतात Samsung Galaxy Z4 Flip 4 शी स्पर्धा करेल. गेल्या महिन्यात हा फोन जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आला होता.

Opp N2 फ्लिप: किंमत काय आहे?

कंपनीने हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटसह लॉन्च केला आहे आणि हँडसेटची प्रारंभिक किंमत 89,999 रुपये ठेवली आहे. खरेदीदार 17 मार्चपासून फ्लिपकार्ट आणि ओप्पो इंडिया स्टोअरमधून हँडसेट खरेदी करू शकतील.

कंपनी येस बँक, ICICI, कोटक बँक, SBI, HDFC आणि प्रमुख बँक कार्ड धारकांसाठी फोनवर 10% किंवा रु 5,000 पर्यंत त्वरित सूट देत आहे. याशिवाय 12 महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआय देखील देण्यात येत आहे. हा स्मार्टफोन जांभळ्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. Oppo ग्राहकांसाठी 5,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज आणि लॉयल्टी बोनस देखील आहे.

Updated : 29 March 2023 1:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top